esakal | मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कलह; चुलत बहिणीची न्यायालयात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

YS Jagan Mohan Reddy Cousin moves High Court for CB

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कलह; चुलत बहिणीची न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यासमोर आता नवा कौटुंबिक पेच निर्माण झाला आहे. त्यांचे काका विवेकानंद रेड्डी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी जगन यांची चुलत बहीण सुनीता नरारेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगन मोहन रेड्डी यांच्या चुलत बहिण सुनीता यांनी त्यांचे अन्य एक चुलत बंधू आणि कडप्पाचे खासदार वाय. एस. अविनाश रेड्डी आणि त्यांचे वडील वाय. एस. भास्कर रेड्डी यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

सुनीता यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाच्या चौकशीवरदेखील संशय व्यक्त केला असून, जगन यांनीही सत्ता आल्यानंतर हा तपास राज्य पोलिसांकडून सीबीआयकडे का दिला नाही, असा सवाल केला आहे.