आंध्र प्रदेशमध्ये भाऊ-बहीण आमने-सामने! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वायएस शर्मिला; कोण आहेत त्या?
नवी दिल्ली- आंध्र प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वायएस शर्मिला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची भगिनी आहेत. शर्मिला यांनी ४ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी त्यांचा पक्ष वायएसआर तेलंगणा पार्टी काँग्रेसमध्ये विलिन केला होता. (YS Jagan Mohan Reddy sister YS Sharmila appointed Andhra Congress Chief after G Rudra Raju quits post)
रुद्रा राजू यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शर्मिला यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार, आज त्यांनाच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रुद्रा राजू यांना काँग्रेस वर्किंग कमिटीमधील विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचेही समाधान करण्याचा प्रयत्न झाला आहे.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतांचे विभाजन होऊ नये आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना लाभ होऊ नये यासाठी प्रक्रियेत भाग न घेण्याचा निर्णय शर्मिला यांनी घेतला होता. शर्मिला यांच्या YSRTP पक्षाने ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. तेलंगणामध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे याचे बक्षीस त्यांना मिळाल्याचे बोलले जाते.
आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. त्यातूनच भाऊ-बहिणीला आमने-सामने आणण्यात आलं आहे.
कोण आहेत वायएस शर्मिला?
शर्मिला या संयुक्त आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएसआरच्या मुलगी आहेत. २०१२ मध्ये संयुक्त आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून YSRCP पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे १८ आमदार देखील आले होते. त्यानंतर जगन मोहन रेड्डी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवास देखील झाला होता. त्यावेळी त्यांची आई विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी पक्ष सांभाळला होता.
YSRCPने निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर जगन मोहन रेड्डी हे मुख्यमंत्री झाले. यानंतर दोघा भाऊ-बहिणीमध्ये भेद निर्माण झाले. २०२१ मध्ये त्यांनी मीडियासमोर स्पष्ट केलं की त्यांचे आणि भावाचे राजकीय मतभेद आहेत. त्यांनी जुलै २०२१ मध्ये वायएसआपर तेलंगाणा पक्षाची स्थापना केली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.