Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Yumnam Khemchand Singh elected as legislative party leader : दिल्लीतील भाजप मुख्यालयात मणिपूरच्या भाजप आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये विधिमंडळ पक्षनेते पदी युमनाम खेमचंद यांची निवड झाली
BJP Elects Yumnam Khemchand Singh as Legislature Party Leader

BJP Elects Yumnam Khemchand Singh as Legislature Party Leader

esakal

Updated on

Yumnam Khemchand Singh as Legislature Party Leader मणिपूरमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ आता संपला आहे. युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरमध्ये विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत.

तत्पूर्वी, दिल्लीतील भाजप मुख्यालयात मणिपूरच्या भाजप आमदारांची बैठक झाली. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ आणि संबित पात्रा यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. एकूण ३५ आमदार उपस्थित होते. तर, आजारपणामुळे दोन आमदार उपस्थित राहू शकले नव्हते.

मणिपूरमध्ये भाजपचे बहुमत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे, परंतु मतैई आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये सरकार कोसळले होते. एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे आणि भाजपने नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

BJP Elects Yumnam Khemchand Singh as Legislature Party Leader
Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

मेतैई आणि कुकी समुदायांमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारानंतर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये पहिल्यांदा सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ऑगस्ट २०२५ मध्ये ती आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com