

Historic Milestone Achieved as Zojila Tunnel Links Kashmir and Ladakh
sakal
श्रीनगर : अखेरचा स्फोट झाला आणि टाळ्यांच्या कडकडाटात झोजिला बोगद्याची दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली. हा केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नाही, तर उणे ३० अंश सेल्सिअस तापमान, हिमवादळे आणि जीवघेण्या हिमस्खलनाचा सामना करणाऱ्या शेकडो कामगारांच्या जिद्दीची ही मानवी यशोगाथा आहे. माणसाच्या अथांग चिकाटीने हिमालयाच्या कुशीत नवा मार्ग कोरला आहे.