esakal | Zomato case: बेंगळुरुतून पळ काढल्याच्या बातमीनंतर हितेशाची इन्स्टाग्राम पोस्ट; आणखी एक ट्विस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Hitesha_20Chandrani

झोमॅटोचा (Zomato) डिलिव्हरी बॉय कामराजकडून (Kamaraj) बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandrani) हिने मारहाण झाल्याचा आरोप केला होता.

Zomato case: बेंगळुरुतून पळ काढल्याच्या बातमीनंतर हितेशाची इन्स्टाग्राम पोस्ट; आणखी एक ट्विस्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- झोमॅटोचा (Zomato) डिलिव्हरी बॉय कामराजकडून (Kamaraj) बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandrani) हिने मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. सोशल मीडियावर या प्रकरणावर उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. काही कलाकारांनीही याप्रकरणावर आपलं मत नोंदवलं. दोन दिवसापूर्वी  झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजने हितेशा चंद्राणीविरोधात एफआयर दाखल केली होती. त्यानंतर ती बेंगळुरुतून फरार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. हितेशाने याप्रकरणी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली असून आपण बेंगळुरुमध्ये असून कुठेही गेलो नसल्याचं म्हटलं आहे. तसेच ती आपल्या सुरक्षेसंबंधात काळजीमध्ये असल्याचं तिने म्हटलं आहे. हितेशाने एक सविस्तर पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

काही सिने कलाकारांनी घडलेल्या प्रकाराबद्दल मला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या या भावनेमुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे. याप्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणीही यावर उलट सुलट प्रतिक्रिया देऊ नये, असं हितेशा म्हणाली आहे. मी माझी प्रतिष्ठा, सन्मान आणि शांती अशी किरकोळ गोष्टींसाठी पणाला लावू शकत नाही, असंही ती म्हणाली आहे. अनेक माध्यमांनी हितेशाने बंगळुरुमधून पळ काढला असल्याचं म्हटलं होतं. पण, तिने आपण बेंगळुरुमध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

एलआयसीची मोठी घोषणा: आता पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेम कुठूनही करा 

बेंगळुरु हे माझे घर आहे आणि मी इथेच आहे, असं हितेशा पोस्टमध्ये म्हणालीये. हितेषाने असाही आरोप केलाय की, 'तिच्या शब्दांना मोडून-तोडून सांगण्यात आले. तिला फक्त काय घडलं ते सांगायचं होतं. मी बेंगळुरुमध्ये एकटी राहते. गेले काही दिवस माझ्यासाठी खूप अडचणीचे गेले आहेत. मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटते. तपासामध्ये सर्व सत्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे'.

हितेशा चंद्राणी हिने मारहाणीचा आरोप केल्यानंतर या आरोपांचे खंडन करताना डिलिव्हरी बॉय कामराजने सोमवारी बंगळुरू पोलिसांत हितेशाविरोधात FIR दाखल केला. बंगळूरू पोलिसांनी सांगितले की, "कामराजने हितेशाविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तिला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. 

Sachin Waze Case: काँग्रेसच्या नेत्याचाच शिवसेनेला कोंडीत पकडणारा प्रश्न

दरम्यान, कामराजने म्हटलं की, "आपण तिला मारलं नव्हतं तर तिनेच  मला मारण्यासाठी चप्पल उगारली होती यावेळी मी तिचा हात पकडत रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचाच हात तिला लागला यावेळी तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकाला जोरात लागल्याने तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. मात्र, तिने असा बनाव केला की मीच तिच्या नाकावर ठोसा लगावला." हितेशाने सोशल मीडियावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. यानंतर पोलिसांनी कामराजला अटक केली होती, पण नंतर त्याला जामिनावर सोडून दिले. मात्र, या प्रकरणाचा खरा खुलासा झाल्यांनतर नेटिझन्सनी कामराजला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे.
 

loading image