#ZomatoUninstalled : झोमॅटो करा अनइन्स्टॉल! सोशल मीडियावर वारं

टीम ईसकाळ
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ट्विटरवर आज #ZomatoUninstalled असा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. झोमॅटोला अनेकांनी विरोध करत हे अॅप अनइन्स्टॉल करायचा निर्णय घेतला आहे. तर, काल ट्विटरवर आधी #BoycottZomato हा ट्रेंड सुरू होता, तर आता #BoycottUberEats हा ट्रेंडही सुरू झाला आहे.   

नवी दिल्ली : डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याचे कारण देत ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोने दिलेले सणसणीत उत्तर बुधवारी नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले. "अन्नाला कुठलाही धर्म नसतो', याची आठवण झोमॅटोने संबंधित ग्राहकाला करून दिली. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या मूल्यांशी तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका कंपनीचे संस्थापक दीपेंदर गोयल यांनी घेतल्याने "झोमॅटो'वर सोशल मीडियात कौतुकाचा पाऊस पडला. 

पण झोमॅटोने असे करून हिंदू ग्राहकाला नाकारले आहे. त्यांच्या या अशा दुहेरी वागण्याचा नेचकऱ्यांनी समाचार घेतला आहे. ट्विटरवर आज #ZomatoUninstalled असा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. झोमॅटोला अनेकांनी विरोध करत हे अॅप अनइन्स्टॉल करायचा निर्णय घेतला आहे. तर, काल ट्विटरवर आधी #BoycottZomato हा ट्रेंड सुरू होता, तर आता #BoycottUberEats हा ट्रेंडही सुरू झाला आहे.   

 

 

 

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमित शुक्‍ला नावाच्या व्यक्तीने मंगळवारी रात्री काही ट्‌विट केले होते. मुस्लिम डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी शुक्‍ला याने कंपनीकडे केली होती. मात्र, त्यास कंपनीने नकार दिला. त्यानंतर संबंधित ऑर्डर रद्द करण्याची मागणी शुक्‍ला याने केली; परंतु कंपनीच्या नियमांनुसार अशा प्रकारे ऑर्डर रद्द करता येणार नाही आणि रद्द केल्यास शुल्क आकारले जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरही वाद घालत शुक्‍ला याने ऑर्डर रद्द करण्यास सांगितले. हा घटनाक्रम शुक्‍ला याने ट्‌विटमध्ये नमूद केला आहे. तसेच, याबाबत वकिलाची मदत घेणार असल्याचेही शुक्‍लाने म्हटले आहे. 

"अन्नाला धर्म नसतो, असे धर्म सांगतो,' असे स्पष्ट करत झोमॅटोकडून ट्‌विट करण्यात आले. त्यानंतर कंपनीचे संस्थापक गोयल यांनीही ठोस भूमिका घेणारे ट्‌विट केले. ""आयडिया ऑफ इंडिया आणि देशातील विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. मूल्यांशी तडजोड करत व्यवसाय करण्याचे आमचे धोरण नाही,'' असे गोयल यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZomatoUninstalled hashtag trending on twitter