esakal | ZP Election 2021: पालघरमध्ये शिवसेनेला मोठा झटका, खासदाराच्या मुलाचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena

ZP Election 2021: पालघरमध्ये शिवसेनेला मोठा झटका, खासदाराच्या मुलाचा पराभव

sakal_logo
By
संदीप पंडित

पालघर: पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत (palghar zp election) साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते ते खासदारपुत्राच्या मतदार संघाकडे. या ठिकाणी राज्यातील सेनेच्या मंत्र्यानी आणि खासदारांनी ठिय्या देऊन हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगरविकास मंत्री शिंदे यांनी जातीने लक्ष घातलेल्या या निवडणुकीत अखेर खासदार पुत्राचा पराभव झाल्याने हा शिवसेनेला (shivsena) धक्का असल्याचे मानले जात आहे. तर त्या विरोधात भाजपने (bjp) ही निवडणूक प्रतिष्ठेची करून स्थानिक विरोधात उपरा असा प्रचाराला रंग देऊन हि निवडणूक जिंकली आहे. निवडणुकी पूर्वी खासदार पुत्र जिंकणार असे दावे केले जात असताना निवडणूक निकालात खासदार पुत्र थेट तीन नंबरला गेल्याचे चित्र येथे दिसत होते. गावित यांच्या मुलाच्या पराभवाने शिवसेनेत आता दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शिवसनिकांना डावलून अन्य पक्षातून आलेल्याना उमेदवारी दिल्याने सेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पालघर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेने ओबीसी जागेवर खासदार पुत्र रोहित या आदिवासी तरुणाला संधी दिल्याने हाच शिवसेनेला धक्का बसण्याचा टर्निग पॉइंट होता. मीरा रोड येथून येऊन पालघरचे आमदार ,खासदार झालेल्या राजेंद्र गावित यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला उतरवल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट नकाशावर आला आहे. या गटात सहा रंगी लढत होऊन त्यात खासदार पुत्राचा पराभव झाला आहे. खासदार राजेंद्र गावित आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती . ओबोसी आरक्षण रद्द झाल्याने या ठिकाणी पोट निवडणूक झाली. साऱ्याच पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले असताना शिवसेनेने मात्र जिल्हापरिषद सदस्यांला घरी बसवून त्या ठिकाणी राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला उमेदवारी दिल्याने हा मतदार संघ चर्चेत आला होता.

हेही वाचा: नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे

या निवडणुकीत शिवसेनेने आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्या बाहेरील शिवसैनिकही प्रचारात उतरविण्यात आले होते. तर भाजपने या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध उपरा असा प्रचाराचा रोख ठेऊन हि जागा आपल्या पदरात पाडल्याने यापुढे शिवसेना नेतृत्वाला निवडणुकीत स्थानिकांना डावलल्यास काय होऊ शकते याचा अंदाज आला असावा. असे चित्र दिसत आहे. यापूर्वी पालघर नगरपरिषद निवडणुकीत हि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आलेल्याना थेट नगराध्यक्षांचे तिकीट दिले होते. त्यात त्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला होता. तर विधान सभेला स्थानिक शिवसैनिकांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या विजय पाटील यांना वसई आणि बाहेरून आयात केलेल्या शर्मा यांना नालासोपारा येथून तिकीट दिल्यावर तसेच बोईसर मध्ये बविआ मधून आलेल्या विलास तरे यांना उमेदवारी दिल्याने तिथे शिवसेनेचा पराभव झाला होता. त्यामुळे यापुढे तरी शिवसैनिकांना न्याय मिळेल का? असा प्रश्न खासदार पुत्राच्या पराभवानंतर शिवसेनेत विचारला जात आहे.

जाणून घ्या मताधिक्क्य

वर्षा धनंजय वायडा (काँग्रेस)3242

पंकज दिनेश कोरे (भाजप)3654

रोहित राजेंद्र गावित (शिवसेना) 2356

विराज रामचंद्र गडग (राष्ट्रवादी) 2251

सारस शशिकांत जाधव(बविआ) 983

प्रितेश परशुराम निकोले (अपक्ष) 437

हितेश शंकर पाटील (मनसे) 223

नोटा - 383

मताधिक्य - 412

loading image
go to top