वारंवार वाचल्यानंतरही चालू घडामोडी लक्षात राहत नाहीत? मग 'या' दहा टिप्स वाचा अन् पटापट उत्तरे द्या

10 tips to remember current affairs nagpur news
10 tips to remember current affairs nagpur news

नागपूर : करंट अफेअर्स (चालू घडामोडी)चे महत्व आपल्याला माहिती आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर विषयांसोबत चालू घडामोडींचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीतर इतर इतरांसाठी देखील चालू घडामोडी तितक्याच महत्वाच्या असतात. मात्र, रोजच्या घडामोडी वाचून लक्षात राहत नाही. मग त्यासाठी आज आम्ही काही टीप्स सांगणार आहोत.

विश्वसनीय वेबसाइट पाहा -
विद्यार्थी आजकाल मोबाईलवरच अभ्यास करतात. याच काळात अनेक वेबसाईट या आमची माहिती खरी असल्याचा दावा करतात. मात्र, कोणत्या वेबासाईटवर विश्वास ठेवायचा हे विद्यार्थ्यांनी ठरवायला पाहिजे. त्यानंतर त्याच वेबसाईटवरून चालू घडामोडींचा अभ्यास करायला पाहिजे. 

व्हिडिओची मदत घ्या -
आजकाल इंटरनेट सेवेची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे सर्वजण व्हिडिओ पाहण्याला महत्व देतात. इतर क्षेत्रासारखे शैक्षणिक क्षेत्रात देखील व्हिडिओच्या मदतीने माहिती दिली जाते. अनेक अभ्यास केंद्र व्हिडिओ ट्युटोरियल बनवून विद्यार्थ्यांसोबत शेअर करतात. त्यामधून महत्वपूर्ण माहिती मिळत असते.

प्रश्न उत्तरांसाठी वेळ काढा -
कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी फक्त वाचन गरजेचे नसून त्यासंबंधी प्रश्न-उत्तरे सोडविणे देखील तितकेच महत्वाचे आहे. गणित असेल किंवा चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे प्रत्येक विषयात महत्वाची असतात. त्यामुळे चालू घडामोडींसंदर्भातील प्रश्न-उत्तरे तुम्ही सोडवली तर नक्कीच ते लक्षात राहण्यास मदत होईल.

मोबाईल अॅप -
मोबाईलच्या जगामध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी मोबाइल अॅपची मदत घेणे उपयुक्त ठरेल. मोबाईल अॅप वापरत असाल तर चालता फिरता तुम्ही स्वतःला अपडेट ठेवू शकता. यामध्ये आजच्या घडामोडींसोबतच तुम्ही मागील दिवसांच्या घडामोडी देखील वाचू शकता.

ई-बुक -
प्रत्येक विषयाची एक गाइड असते त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकाशन एक ऑनलाइन ई-बुक देखील काढतात. त्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध असते. तुम्ही इंटरनेटवरून ती ई-बुक डाउनलोड करू शकता. 

नोट्स काढणे -
चालू घडामोडींचा अभ्यास करताना नोट्स काढणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या वेबसाईट वापर करून अभ्यास करत असाल त्याची संपूर्ण माहिती एकत्रित करा. 

अंडरलाइन करा - 
तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल आणि कोणती गोष्ट महत्वपूर्ण वाटत असेल तर त्याला अंडरलाइन करायला विसरू नका. तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर त्यामध्ये गरजेच्या असणाऱ्या चालू घडामोडींबाबत माहिती असेल तर अंडरलाइन करायला विसरू नका.

ग्रुप डिस्सशन - 
चालू घडामोडींचा अभ्यास झाल्यानंतर त्यावर तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा. त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी लवकर लक्षात राहतील आणि ते देखील दीर्घकाळ. अभ्यासाठी ग्रुप डिस्कशन हा सर्वोत्तम पर्याय आहे.

मागील वर्षीचे प्रश्न सोडवा -
तुम्ही एखादी परीक्षा देत असाल तर त्या विषयासंबंधी मागील वर्षीचे प्रश्न एकत्रित करा. त्यामधून चालू घडामोडींचे प्रश्न वेगळे करा. त्यानुसार यंदा कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे ठरवा. त्यानंतर यंदाच्या चालू घडामोडी वाचा.

इतर स्त्रोत -
वरील स्त्रोत वापरल्यानंतर तुम्ही भारत सरकारची वेबसाइट पीआयबी, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडीओवरून देखील चालू घडामोडींचा अभ्यास करू शकता.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com