Govt Hostel : नुकताच बारावीचा निकाल लागला असून उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे. तेव्हा मुलांना निकालाबरोबरच आता पुढे कुठलं क्षेत्र निवडायचं, उच्चं शिक्षणासाठी शहरात जायचे झाल्यास वसतीगृह कसे मिळेल हे सगळे प्रश्न आतापासूनच पडले असतील. मात्र गोंधळून जाण्याचे कारण नाही. इथे उच्च शिक्षणासाठी शासनाचे मोफत वसतीगृह कसे मिळवायचे त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
मुलांना दहावीनंतरच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासनाचे मोफत वसतीगृह आहेत. मात्र त्यासाठी अर्ज कसा करायचा हे अनेकांना माहिती नसते. तेव्हा आज आपण इथे अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर जाणून घेऊया. दहावीनंतर तुम्ही उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो सिटीजमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आधीच राहाण्याची सोय करून ठेवावी. समाज कल्याणच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना मोफत जेवण, राहाण्याची सोय उपलब्ध आहे.
समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी अर्ज कसा करायचा
समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी अर्ज करण्याआधी त्याचा ऑफलाइन फॉर्म तिथून घेऊन यावा. हा फॉर्म घेण्यासाठी ठरावीक वेळ आणि कालावधी शासनाकडून जाहीर केला जातो. एकदा ऑफलाइन कागदी फॉर्म ठराविक वसतीगृहात संपलेत की त्याची कॉपी उपलब्ध नसते. तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी हा फॉर्म लवकऱ्यात लवकर समाज कल्याणच्या ऑफिसमधून घेऊन यावा. तसेच हे लक्षात ठेवावे की हा फॉर्म फक्त ऑफलाइनच भरला जाऊ शकतो. ही प्रक्रिया ऑनलाइन होत नाही.
महत्वाच्या बाबी
विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेनुसार तसेच त्यांच्या कॅटेगिरीनुसार या हॉस्टेलमध्ये प्राधान्य देण्यात येते. मागासवर्गीयांसाठी अतिरिक्त राखीव जागा इथे असतात.
अर्ज करण्यासाठीचे महत्वाचे कागदपत्र
विद्यार्थ्याचे आधार कार्ड
रहिवासी दाखला
मार्कशीट
जातीचे प्रमाणपत्र
फोटो
उत्पन्नाचा दाखला
कॅरेक्टर सर्टिफिकेट
समाज कल्याणकडून जारी करण्यात आलेल्या तारखेच्या नंतर तुम्ही अर्ज जमा केल्यास तुमचे नाव यादीत नसणार, तेव्हा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे फार महत्वाचे असते. (10th Result)
हॉस्टेलमध्ये मिळणाऱ्या सुविधा
शासनाच्या या मोफत हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण तसेच त्यांच्या शालेय पुस्तकांचा खर्चसुद्धा दिला जातो. हे हॉस्टेल पूर्णपणे मोफत असते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे इथे विशेष लक्ष दिले जाते. (Career)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.