SBI recruitment: SBI मध्ये होणार नोकरभरती, 4 मे अर्ज भरण्याची शेवटची तारीख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sbi

SBI मध्ये होणार नोकरभरती, 4 मे अर्ज भरण्याची शेवटची तारीख

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मार्च महिन्यात नोकऱ्यांच्या भरतीत सहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसत आहे . नोकरभरतीत सुधारणा होत असून विविध क्षेत्रात नोकरभरती होत आहे. अशातच स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) कडून specialist cadre officer पदासाठी 11 जागांवर नोकरभरती होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मे 2022 आहे. यासाठी ऑनलाईन अ‍र्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करायचा आहे. यासंदर्भात अधिक माहिती एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिली गेली आहे. ( State Bank of India will be recruiting for 11 posts of specialist cadre office)

हेही वाचा: मार्चमध्ये रोजगारात ६ टक्के वाढ, मुंबई नोकरभरतीत अव्वल

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाची वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.

  • होमपेज वरील “Careers” च्या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर “Current Openings” च्या टॅब वर क्लिक करा.

  • Apply Online link चा पर्याय निवडा.

  • रजिस्टर करा.

  • ए‍प्लिकेशन फॉर्म भरा.

  • तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा.

  • एप्लिकेशन फी भरा.

  • फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

जनरल, ओबीसी, ईडब्लूएस उमेदवारांना 750 रूपये नॉन रिफेंडेबल शुल्क असणार आहे तर एससी,एसटी आणि पीडब्लूडी उमेदवारांना शुल्क लागू नसेल.

हेही वाचा: करिअर अपडेट : वारसा पर्यटनात रोजगाराच्या संधी!

एसबीआयमध्ये खालील पदांसाठी नोकरभरती होणार आहे

Vice President & Head - 1

Senior Special Executive Program Manager - 4

Senior Special Executive Customer experience, Training & Scripts Manager - 2

Senior Special Executive Command Centre Manager -3

Senior Special Executive- 1

Web Title: 11 Vacancies Of Specialist Cadre Officer In Sbi Details Here Check Last Date

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top