सरकारी बॅंकॉंमध्ये 1828 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! आज शेवटची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IBPS
सरकारी बॅंकॉंमध्ये 1828 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! आज शेवटची संधी

सरकारी बॅंकॉंमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती! आज शेवटची संधी

सोलापूर : बॅंकांमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. IBPS (Institute of Banking Personnel Selection) द्वारे विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये (Government Banks) 1800 हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer - SP) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज प्रक्रिया आज 23 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी त्वरित आयबीपीएसच्या www.ibps.in या वेबसाइटवर अर्ज करावा. शेवटच्या क्षणी एकाच वेळी लॉग इन केलेल्या अधिक उमेदवारांमुळे अर्जाच्या पेजवर तांत्रिक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज प्रक्रियेअंतर्गत 850 रुपये विहित शुल्क भरण्याचीदेखील आज (23 नोव्हेंबर) शेवटची तारीख आहे.

हेही वाचा: 'TET'च्या पहिल्या पेपरला 85 तर दुसऱ्या पेपरला 86 टक्के उपस्थिती

कोण अर्ज करू शकतो?

IBPS द्वारे जारी केलेल्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती अधिसूचना 2021-22 नुसार, या पदांसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी रिक्त पदांशी संबंधित विभागातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच, उमेदवारांचा जन्म 2 नोव्हेंबर 1991 पूर्वी आणि 1 नोव्हेंबर 2001 नंतर झालेला नसावा. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी IBPS SO 2022-23 भरती अधिसूचना पाहावी.

हेही वाचा: DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, पंजाब अँड सिंध बॅंक, यूको बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची IBPS द्वारे भरती केली जाणार आहे. या सर्व बॅंकांमध्ये आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, मानव संसाधन अधिकारी आणि विपणन अधिकारी यांच्या एकूण 1828 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात करण्यात आली आहे.

loading image
go to top