'टीईटी'च्या पहिल्या पेपरला 85 तर दुसऱ्या पेपरला 86 टक्के उपस्थिती | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam
'टीईटी'च्या पहिल्या पेपरला 85 तर दुसऱ्या पेपरला 86 टक्के उपस्थिती

'TET'च्या पहिल्या पेपरला 85 तर दुसऱ्या पेपरला 86 टक्के उपस्थिती

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) वतीने रविवारी (ता. 21) शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test - TET) घेण्यात आली. पहिल्या पेपरसाठी 9 हजार 433 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 23 जणांनी ही परीक्षा दिली. पहिल्या पेपरला 1 हजार 409 जण गैरहजर होते. दुसऱ्या पेपरसाठी 8 हजार 471 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सात हजार 304 जणांनी ही परीक्षा दिली. दुसऱ्या पेपरला 1 हजार 167 जण गैरहजर होते. पहिल्या पेपरला 85.05 तर दुसऱ्या पेपरला 86.22 टक्के विद्यार्थी उपस्थित राहिले होते.

हेही वाचा: 'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!

सोलापूर शहरात पहिल्या पेपरसाठी 25 परीक्षा केंद्रे होती. या परीक्षेसाठी 25 केंद्रसंचालक, दोन उप केंद्रसंचालक, 86 पर्यवेक्षक, 404 समावेक्षक, 50 लिपिक व 100 परिचर असे एकूण 667 जणांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते. पर्यवेक्षकीय यंत्रणेत नियंत्रणासाठी 6 झोनल अधिकारी, 25 सहाय्यक परीरक्षक नियुक्त करण्यात आले होते. 25 केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.

हेही वाचा: DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

दुसऱ्या पेपरसाठी सोलापुरात एकूण 23 केंद्रे होती. या परीक्षेच्या नियोजनासाठी 23 केंद्र संचालक, दोन उप केंद्र संचालक, 77 पर्यवेक्षक, 361 समवेक्षक, 46 लिपिक व 92 परिचर असे एकूण 601 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पर्यवेक्षकीय नियंत्रणासाठी 6 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या पेपरचेही व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी पहिल्या सत्रात सोलापुरातील एम. ए. पानगल प्रशालेत तर दुपारच्या सत्रात सोलापुरातील संभाजीराव शिंदे प्रशाला व छत्रपती शिवाजी प्रशाला येथील परीक्षा केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली.

loading image
go to top