पहिली दुसरीच्या पुस्तकाचे यंदा शेवटचे वर्ष; पुढील वर्षापासून नवी अभ्यासक्रम प्रस्तावित

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील.
1st and 2nd standard student books syllabus change in next academic year
1st and 2nd standard student books syllabus change in next academic yearSakal

Pune News : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र, पुढील वर्षी अर्थात शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच नवीन अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत. मागील शैक्षणिक वर्षापासूनच (जून २०२३) पथदर्शी स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी,

हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्यात आली आहे. ही एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत.

या वर्षी सुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील,असे कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com