HSC Supplementary Result : बारावीत उत्तीर्ण झालेले २२ हजार विद्यार्थी वेठीस; पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे दारेही बंद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची बघ्याची भूमिका
22 thousand students passed 12th standard doors of degree professional courses closed education
22 thousand students passed 12th standard doors of degree professional courses closed educationesakal

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेत 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रवेशासह विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे दारेच बंद झाली असल्याने हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वेठीस धरले जाणार आहेत.

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश मिळावा त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सात वर्षांपूर्वी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला होता.

परंतु या निर्णयालाच उच्च व तंत्र शिक्षण आदी विभागाकडून हरताळ फासला जात आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश विद्यापीठांमध्ये कोणताही पर्याय शिल्लक ठेवण्यात आला नसून त्यासाठी मागील आठवडाभरापासून 'सकाळ'मध्ये या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात मोहीम चालवण्यात आली आहे.

त्याची कोणतीही दखल उच्च व तंत्र शिक्षण विभागासह इतर विभागाने घेतली नसल्याने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा मोठा प्रश्न उभा टाकला आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये पदवीचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. या सोबतच सीईटी सेलच्या माध्यमातून अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीसारख्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

त्यामुळे आज जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत व ज्यांनी यापूर्वी सीईटी अथवा वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय स्तरावरील परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग खुला नसल्याने या विद्यार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर,औरंगाबाद आदी ठिकाणच्या विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशाची प्रक्रिया कधीच पूर्ण झाली आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये वर्ग देखील सुरू झाले आहेत असे कारण सांगून विद्यापीठ प्रशासनाकडून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केली जाण्याची शक्यता आहे.

अशावेळी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला एकीकडे विभागाकडून आणि दुसरीकडे संबंधित महाविद्यालयाकडून हरताळ फासला जाणार असल्याने 22 हजार 144 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .

चंद्रकांत पाटील यांची बघ्याची भूमिका

बारावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात संबंधित विभागांना आदेश देण्याची मुख्य जबाबदारी ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आहे. मात्र तेच बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.

पाटील यांच्या एका आदेशामुळे राज्यातील व्यावसायिक आणि पारंपारिक अभ्यासक्रमांच्या रिक्त असलेल्या जागांवर बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहजपणे संधी मिळू शकते मात्र त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून या संदर्भात कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com