
नवी दिल्ली : सर्वाधिक युवकांची ताकद म्हणून उदयास येणाऱ्या भारतामध्ये (India) रोजगार निर्मितीचे (Employment) भयावह चित्र समोर आले आहे. भारतातील रोजगार निर्मितीची समस्या धोकादायक रूप धारण करत असल्याचे चित्र दिसून येत असून, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2017 आणि 2022 दरम्यान, एकूण कामगार सहभागाचा दर 46 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर घसरला आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. (Employment In India)
एवढेच नव्हे तर, योग्य नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या सुमारे 21 दशलक्ष कामगारांनी काम (Work) सोडल्याचे यातून समोर आले आहे. तर, पात्र लोकसंख्येपैकी केवळ 9 टक्के लोकांना रोजगार मिळाल्याचे यामध्ये नमुद करण्यात आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट (CMIE ) या मुंबईतील खासगी संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार, कायदेशीर कामाचे वय असलेल्या 900 दशलक्ष भारतीयांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना आता नोकरी नको असल्याची भावना निर्माण झाली आहे.
निराश कामगारांची एकूण संख्या लक्षात घेता भारतातील तरुण लोकसंख्येला लाभांश मिळण्याची शक्यता नसल्याचे मत बंगलोरमधील सोसायटी जनरल जीएससी प्रायव्हेटचे अर्थशास्त्रज्ञ कुणाल कुंडू यांनी व्यक्त केले आहे. तसेच यामुळे विषमता आणखी वाढेल असेही कुंडू यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या 2020 च्या अहवालानुसार, 2030 पर्यंत भारताला किमान 90 दशलक्ष नवीन बिगरशेती नोकर्या निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी वार्षिक 8 टक्के ते 8.5 टक्के जीडीपी वाढीची आवश्यकता असेल, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.