Shivaji University : पदवी परीक्षेत कॉपी करणाऱ्या 678 विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

आतापर्यंत १८० परीक्षांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत.
Shivaji University Kolhapur
Shivaji University Kolhapuresakal
Summary

पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे परीक्षा मंडळाला दिसून आले.

-संतोष मिठारी

कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांतील गैरप्रकारांना (कॉपी) आळा घालण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) परीक्षा (Exam) व मूल्यमापन मंडळाने भरारी पथकांची संख्या वाढविली. त्याची अंमलबजावणी हिवाळी सत्रातील परीक्षांमध्ये केली.

त्यामुळे आतापर्यंत झालेल्या १८० परीक्षांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. ऑक्टोबर- नोव्हेंबर या हिवाळी सत्रातील विद्यापीठाच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. या सत्रात एकूण ७८० परीक्षा होणार आहेत.

Shivaji University Kolhapur
मोडी लिपीतील कुणबी मराठा ओळखणं होणार शक्य; मुस्लिम राजवटीत या लिपीचा सर्वाधिक वापर, जुन्या कागदपत्रांतही उल्लेख

त्यात पदवी प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांकडून, तर तृतीय वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जात आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आदी विद्याशाखांतील पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे परीक्षा मंडळाला दिसून आले.

Shivaji University Kolhapur
धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय? चोरीच्या संशयातून पत्नीची भोंदूबुवासमोर विवस्त्र पूजा

त्यावर या मंडळाने कॉपी करणाऱ्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी असलेल्या प्रत्येकी एक भरारी पथकांची संख्या तीन इतकी केली. पूर्वी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १६ परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात येत होते. त्यांची संख्या २७ इतकी केली. या पथकांच्या धडक कारवाईने आतापर्यंत ६७८ जण कॉपी करणारे सापडले आहेत. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीकडून कारवाई होणार आहे.

हिवाळी सत्रातही १४ दिवसांत निकाल

विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०२३ या उन्हाळी सत्रातील परीक्षांसाठी कमी वेळेत मूल्यांकन करण्याची नवी पद्धतीचा अवलंब केला.कमी दिवसांत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाने राज्यात आघाडी घेतल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. हिवाळी सत्रात आतापर्यंत ५९परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ‘कॅप’ सेंटरवर योग्य पद्धतीने मूल्यांकन सुरू आहे. या सत्रातील बहुतांश परीक्षांचे निकाल १४ दिवसांत लावण्याच्यादृष्टीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Shivaji University Kolhapur
Karnataka Politics : लिंगायत मतदार भाजपकडं वळणार? 'या' बड्या नेत्याच्या सुपुत्राला 'प्रदेशाध्यक्ष' करुन भाजपनं खेळला वेगळाच डाव

महाविद्यालयांना ६ डिसेंबरपर्यंतची मुदत

या हिवाळी सत्रापासून विद्यापीठाने पदवी द्वितीय वर्षाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून ३० ऑक्टोबरपासून प्रथम आणि द्वीतीय वर्षाच्या परीक्षा घेण्यास सुरूवात केली. याअंतर्गत आतापर्यंत पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या ८० हून अधिक परीक्षा झाल्या आहेत. सर्व परीक्षा पूर्ण करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने महाविद्यालयांना ६ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

Shivaji University Kolhapur
Konkan Politics : ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; शिवसेना नेत्याचं माजी आमदाराला ओपन चॅलेंज

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

  • एकूण महाविद्यालये २७६

  • विद्यापीठातील अधिविभाग ३४

  • हिवाळी सत्रातील परीक्षा ७८०

  • परीक्षार्थींची संख्या २ लाख ३० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com