मोडी लिपीतील कुणबी मराठा ओळखणं होणार शक्य; मुस्लिम राजवटीत या लिपीचा सर्वाधिक वापर, जुन्या कागदपत्रांतही उल्लेख

सध्या राज्यभर मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कुणबी दाखल्यांचा विषय चर्चेत आहे.
Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation Kunbi Modi Lipiesakal
Summary

कुणबी मराठा दाखल्याच्या पुराव्यासाठी जुने दस्तऐवज तपासताना अनेकांना मोडी लिपी समजून घेण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.

-रामेश्वर विभूते

सोलापूर : सातव्या ते आठव्या शतकापासून आपल्याकडे मोडी लिपी (Modi Lipi) अस्तित्वावात आहे. परंतु, १४ व्या शतकात आणि मुस्लिम राजवटीत या लिपीचा मोठ्याप्रमाणात वापर होत असल्याचे पुरावे आहेत. तसेच १६ व्या शतकापासून १९६० पर्यंतसुद्धा हीच लिपी वापरली गेली आहे.

सध्या राज्यभर मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कुणबी दाखल्यांचा विषय चर्चेत आहे. कुणबी मराठा दाखल्याच्या पुराव्यासाठी जुने दस्तऐवज तपासताना अनेकांना मोडी लिपी समजून घेण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र, मराठा बांधवांनी आपल्याजवळ असलेल्या जुन्या कागदपत्रात कुणबी मराठा दोन अक्षरे नीट तपासली तर त्यांना ही लिपी समजू शकते.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Kunbi Records : कुणबी पुरावे शोधण्यासाठी मोडी लिपी जाणकारांची निवड

यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, अशी माहिती महाराष्ट्र पुराभिलेखागाराचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्रधारक डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सातबारे, खरेदीखत, गहाण खत, जन्म दाखले, मृत्यू दाखले, शाळेचे दाखले, बक्षीसपत्र या सर्व कागदपत्रात जातीचा आणि वयाचा उल्लेख शक्यतो केला जायचा. सोलापूरमधील काही कागदपत्रात कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असू शकतील.

दक्षिण सोलापूर तहसील, उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, सातबारा रजिस्टर यात हे उल्लेख आलेले आहेत. तसेच महादेव कोळी व लिंगायत वाणी यांचाही यात उल्लेख आहेत. वाणी आणि कोळी यांचे उल्लेख अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या दप्तरामध्ये जास्त आलेले आहेत. सोलापूरचे वतनदार देशमुख, देशपांडे, शेटे व महाजन यांच्याकडेही पुरातन कागदपत्रे आहेत.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात आढळले तब्बल 20 हजार 'कुणबी'; शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक नोंदी!

त्यांचे वाचनही डॉ. माशाळकर यांनी केले आहे. परंतु यात केवळ वतनदारांची माहिती असल्याचे ते सांगतात. सध्याला जुनी कागदपत्रे तपासण्याचे काम मराठा समाज बांधव करत आहेत. त्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रात ठराविक अक्षरे आहेत का, हे तपासले तरी कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आणि तपासण्यासाठी देण्यात येणारे हजारो लाखो रुपये त्यांचे वाचतील, असे ते म्हणाले.

मोडी म्हणजे मराठीची रनिंग लिपी

पूर्वीचे लिखाण हे बोरुच्या साह्याने व्हायचे. बोरू टाकातील शाईमध्ये बुडवल्यावर त्याचे डाग कागदावर पडू नयेत म्हणून या लिपीचे लेखन बोरू न उचलता व्हायचे. म्हणजे कागदाच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूकडे हात न उचलता केलेले लेखन, म्हणून मोडीला मराठीची रनिंग लिपीही म्हणता येईल. तसेच मोडी ही लिपी होती आणि त्याची भाषा मराठी होती. सध्या देवनागरी ही लिपी आणि मराठी भाषा आहे, असेही डॉ. माशाळकर म्हणाले.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकीची महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार? मराठा क्रांती मोर्चाचा दादांना तीव्र विरोध

मोडी लिपीचे वैशिष्ट्ये...

  • पुणे, मुंबई, नाशिकमध्ये आहेत पुराभिलेखागार

  • वाचक तज्ज्ञांच्या अभावाने अनेक कागदपत्रे पडून

  • म्हैसूरच्या तंजावरमध्ये सर्वाधिक मोडी कागदपत्रे

  • दीर्घ व ऱ्हस्व नाही, सर्वच दीर्घ

  • सलग लिखाण असल्याने वेगाने लिहिणे सोपे

  • मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरतात

  • अक्षरांची वळणे गोलाकार असतात

  • देवनागरीच्या उलट, काना खालून वर जातो

  • जोडून लिखाण म्हणून पुढचे अक्षर चटकन लिहिता येते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com