Admission
AdmissionSakal

Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सशस्त्र दलात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणांसाठी आता तांत्रिक आणि विधी विभागांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या.
Published on

पुणे - सशस्त्र दलात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणांसाठी आता तांत्रिक आणि विधी विभागांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. सैन्यदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हस कमिशन अंतर्गत तांत्रिक (एसएससी-टेक) आणि ‘जज अॅडव्होकेट जनरल’ (जॅग) अशा दोन प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

या दोन्ही प्रवेशासाठी लेखी परीक्षा नसून थेट सर्व्‍हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (एसएसबी) उमेदवारांची निवड पुढील प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे प्रवेश मिळेल.

एसएससी-टेक प्रवेशांतर्गत अभियांत्रिकीची पदवी असलेल्या तसेच अधिकारी व जवानांच्या विधवांना अर्ज करता येणार आहे. यासाठी एकूण १९६ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यातील १७५ जागा पुरुष आणि १९ जागा महिला उमेदवारांसाठी असेल. तसेच दोन जागा या अधिकारी व जवानांच्या विधवांसाठी आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षांपर्यंतची असून विधवांसाठी ती ३५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

Admission
Army MNS Admission : बारावीनंतर मुलींना लष्करात नोकरी करण्याची मिळणार संधी

दरम्यान ‘जॅग’ प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे विधीची पदवी असणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांच्यासाठी वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे ठेवण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे ५ पुरुष आणि २ महिला अशी एकूण ७ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. एसएससी टेकसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै तर जॅग प्रवेशाकरिता २१ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com