भारतीय सैन्यदलाच्या 'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी (पुरुष) असून सुमारे 90 जागा यामध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये एकूण 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. 

पुणे : लष्कराच्या सैन्य दलात अधिकारी म्हणून काम करण्यासाठी तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी (टीईएस- 44) ऑनलाईन अर्ज सेवा सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असून 9 सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी (पुरुष) असून सुमारे 90 जागा यामध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये एकूण 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. 

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

या प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा न देता थेट 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखती' (एसएसबी) देता येईल. तसेच या तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रता काय आहे यासाठी काही ठराविक मार्गदर्शन तत्वे आखण्यात आले आहेत. तर याबाबतची अधिक माहिती सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेत स्थळाचा वापर करत अर्ज भरता येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission process for TES of Indian Army begins

Tags
टॉपिकस
Topic Tags: