esakal | NEET Exam : नीट परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध; 'असे' मिळवा प्रवेशपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam

NEET : नीट परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एन्ट्रन्स टेस्‍ट (नीट-यूजी) (NEET-UG) २०२१ परीक्षा रविवारी (ता. १२) दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत देशभरातील २०२ शहरांमध्ये ऑफलाइन होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) संकेतस्‍थळावर उपलब्‍ध झाले आहे. या परीक्षेच्‍या आधारे एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी शाखांतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

असे मिळवता येईल प्रवेशपत्र

विद्यार्थ्यांना त्‍यांचा अर्ज क्रमांक (ॲप्लि‍केशन फॉर्म) आणि जन्‍मतारीख नोंदवून प्रवेशपत्र मिळवता येईल. प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्र डाउनलोड करायचे आहे. तसेच प्रवेशपत्रावर दिलेल्‍या सूचनांचे बारकाईने वाचन करायचे आहे. उत्तरपत्रिका असलेल्‍या ओएमआर ॲन्‍सरशिटचा नमुना, तसेच उत्तरे भरण्यासंदर्भातील सविस्‍तर तपशील एनटीएमार्फत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!

हेही वाचा: CET : अधिकृत तारखांची प्रतीक्षा! विद्यार्थी-पालकांत संभ्रम

सहाय्यता क्रमांक उपलब्‍ध

प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यात काही अडचणी उद्‌भवत असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सहाय्यता क्रमांक उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍यानुसार अशा विद्यार्थ्यांना ०११-४०७५९००० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. किंवा neet@nta.ac.in या ई-मेलवर तक्रार नोंदविता येईल.

हेही वाचा: खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!

loading image
go to top