esakal | CET Exam : अधिकृत तारखांची प्रतीक्षा! सोशल मीडियावरील परिपत्रक संकेतस्‍थळावर अनुपलब्‍ध
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

CET : अधिकृत तारखांची प्रतीक्षा! विद्यार्थी-पालकांत संभ्रम

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची (CET) प्रवेश परीक्षा रेंगाळल्यामुळे विद्यार्थी व पालक बेजार झाले आहेत. सोशल मीडियावर परीक्षांच्‍या तारखांचे परिपत्रक व्‍हायरल होत असताना, सीईटी सेलच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर हे परिपत्रक उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे सीईटी परीक्षांच्‍या तारखांबाबत खमंग चर्चा होत असली, तरी अधिकृत तारखेच्‍या घोषणेची विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे.

सूचनापत्राशी हुबेहुब मिळणारे एक परिपत्रक प्रचंड व्‍हायरल

सोशल मीडियावरील माहितीवर विश्‍वास न ठेवता, विद्यार्थी-पालकांनी अधिकृत संकेतस्‍थळाला भेट देत अद्ययावत माहिती जाणून घ्यावी, असे नेहमी यंत्रणांकडून आवाहन केले जाते. सध्या संकेतस्‍थळाऐवजी सोशल मीडियावरच सीईटी परीक्षांच्‍या तारखांचे परिपत्रक व्‍हायरल होत आहे. अशात विद्यार्थी व पालकांचा संभ्रम अधिकच वाढला आहे. विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जातात. त्‍यामुळे अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीप्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण होऊन व नंतर वाढीव मुदत देऊनही दीर्घ कालावधी लोटला आहे. तरीही सीईटी सेलने अद्यापपर्यंत परीक्षेच्‍या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे सीईटी सेलच्‍या सूचनापत्राशी हुबेहुब मिळणारे असे एक परिपत्रक मात्र प्रचंड व्‍हायरल होत आहे.

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

वेळ मर्यादेत प्रवेशप्रक्रिया राबविणे कठीण

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी निर्धारित केला आहे. अद्यापपर्यंत सीईटी परीक्षाच झालेल्या नाहीत. या परीक्षा झाल्‍यानंतर निकाल लावत नंतर पुढील प्रक्रिया राबवायची आहेत. ही प्रक्रिया दीर्घ कालावधी चालणार असून, अध्यापन प्रक्रिया प्रभावित होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा: नाशिक : जिल्‍ह्यात आज शंभर रुग्‍णांची कोरोनावर मात

loading image
go to top