esakal | खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!
sakal

बोलून बातमी शोधा

Night College

खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाजळगाव ः खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटीने (Khandesh College Education Society) कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले आहे. खानदेशातील हे पहिले रात्रकालीन महाविद्यालय (Night College) असणार आहे. महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी ( Bahinabai Chaudhary North Maharashtra University) संलग्नित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा, अशी माहिती प्राचार्य नंदकुमार भारंबे यांनी मंगळवारी (ता. ७) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: धरणे ‘ओव्हर फ्लो’..हतनूर, वाघूरचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर


सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व संचालक मंडळ सतत खानदेशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन सामाजोभिमुख, विद्यार्थिकेंद्रित रोजगारभिमुख आणि कौशल्यधीष्ठीत अभ्यासक्रम राबविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आपल्या खानदेश परिसरात नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे ‘कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालय’. जे विद्यार्थी काम करतात, छोटा- मोठा व्यवसाय, नोकरी करतात, त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी दिवसा श्रम करून रात्रकालीन महाविद्यालयात नियमित वर्ग शिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी हे महाविद्यालय असेल. साधारणतः सायंकाळी नियमित वर्ग भरले जाऊन शिक्षणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे सुलभ होईल. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी आपल्या क्षमता वाढवून स्वतःचा विकास करू शकेल.

हेही वाचा: छत्तीसगडचे हे हिल्स स्टेशन बघितले का? नाही.. तर नक्की बघा


संगीत, नाट्य शिकविले जाणार
केसीई सोसायटीने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तो या २०२१- २२ या शैक्षणिक वर्षापासून जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील, ते या रात्रकालीन महाविद्यालयात कला शाखेत संगीत, नाट्य, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र हे विषय आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ शकतात. हे महाविद्यालय मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात असेल. मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे, शिक्षणशास्त्र शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, पीजी महाविद्यालयाचे प्राचार्य झोपे, कान्ह ललित कला महाविद्यालयाचे संचालक मिलन भामरे, सुभाष तळेले व जनसंपर्क अधिकारी संदीप केदार या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top