esakal | यूपीएससीच्या EPFO परीक्षेसाठी Admit Card जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

यूपीएससीच्या EPFO परीक्षेसाठी Admit Card जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : UPSC EPFO Admit Card 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) ईपीएफओ ईओ / एओचे प्रवेश पत्र नुकतेच जारी केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) अंमलबजावणी अधिकारी आणि लेखा अधिकाऱ्यांच्या पदांकरिता यूपीएससीच्या अधिसूचनेनुसार, अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आयोगाच्या upsc.gov. या लिंकवरती जावून upsconline.nic.in ला क्लिक केल्यास त्यावरून अॅडमीट कार्ड डाउनलोड करू शकतात.

9 मे रोजी होणार परीक्षा

यूपीएससीच्या वतीने ईपीएफओ ईओ / एओ परीक्षा 9 मे 2021 रोजी दोन तासाच्या एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येईल, जी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्वसाधारण क्षमता चाचणीशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुविध प्रश्न विचारले जातात. परीक्षेची भाषा इंग्रजी अथवा हिंदी असणार आहे. ही परीक्षा 300 गुणांची असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीय क्रमांक वजा केला जाईल.

खुशखबर! SBI बँकेत 92 पदांसाठी मोठी भरती

'या' सूचनांचे पालन करणे आवश्यक

कोविडच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या परीक्षेला उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना अनेक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करणे सर्व उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.

  • परीक्षेदरम्यान सर्व उमेदवारांना मास्क घालणे सक्तीचे असेल. ज्या विद्यार्थ्यांनी मास्क घातला नसेल, त्यांना परीक्षेला बसता येणार नाही.

  • परीक्षेविषयी संपूर्ण चाचणी (माहिती) झाल्यावर उमेदवारांना चेहऱ्यावरचा मास्क हटविणे जरुरीचे असेल.

  • उमेदवारांना हँड सॅनिटायझर देखील बंधनकारक असेल.

  • कोविडच्या नियमांचे पालन करून उमेदवारांना परीक्षा हॉल आणि आवारात सामाजिक अंतर, तसेच वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल.