AI Opportunities : ‘एआय’मुळे संधी वाढतील!

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले, की एक मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे आता या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील, लोक बेरोजगार होतील.
AI opportunities for student education technology computer new changes
AI opportunities for student education technology computer new changessakal
Summary

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले, की एक मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे आता या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील, लोक बेरोजगार होतील.

- सचिन आरोंदेकर

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले, की एक मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे आता या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील, लोक बेरोजगार होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत (एआय) हीच भीती व्यक्त केली जाते. मुळात अशा चर्चा या काही नवीन नाहीत.

८०-९०च्या दशकात संगणक आल्यावर अशाच चर्चा रंगल्या, मात्र वस्तुस्थिती तशी झाली नाही. सुरवातीला वापरासाठी कठीण असणाऱ्या संगणकात मोठे बदल होत गेले. संगणकाने तंत्रज्ञानात, उद्योगात, सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. अनेक नवीन संधी निर्माण झाल्या, तसेच येत्या काही वर्षांत ‘एआय’मुळे बदल होतील.

AI opportunities for student education technology computer new changes
Education : बारावीनंतर विद्यार्थ्यांना घेता येणार ‘बी.एड.’मध्ये थेट प्रवेश; डी. एड. कॉलेज यंदाही सुरूच राहणार

याचा वापर करणाऱ्यांसाठी नवनवीन क्षेत्रे तयार होतील. त्यामुळे नव्याने करिअर करणाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी एखादे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे काय होईल या वादात न गुंतता नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण कसे तयार होतो, आपल्यात कोणते कौशल्य वाढवू शकतो यावर भर द्यावा.

बदल स्वीकारायला शिका!

डिजिटल कॅमेरा आल्यानंतर फोटोग्राफरचा रोल बदलला. आता मोबाईलमध्येच कॅमेरा आल्यानंतर सहाजिकच फोटोग्राफर काय करणार असा प्रश्न होता. परंतु अनेकांनी आपले स्कील वाढवले. फोटोशॉप, डिझायनिंग, पेंट थ्रीडी अशा अनेक टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आल्या आहेत. त्यांना प्रचंड स्कोप आहे.

ज्यांनी स्वतःला अपडेट केले त्यांना या नवीन संधी मिळाल्या. त्यामुळे तंत्रज्ञान हे सतत बदलणार आहे. हे बदल स्वीकारण्यासाठी आपण सदैव तयार राहायला हवे. तंत्रज्ञान बदलानंतरच्या गरजा आपण शोधल्यास आपोआपच आपल्याला नवीन संधी सापडतील. ‘एआय’ आणि रोबोटिक्सबाबत नेमके हेच होत आहे.

AI opportunities for student education technology computer new changes
AI ने तयार केले क्युट 'फ्रेंड्स' होतायत व्हायरल..

नवे तंत्रज्ञान आल्यावर नवी कौशल्ये विकसित होतात, त्यातून नवे रोजगार उपलब्ध होतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे विमानतळावर अनेक बदल घडत आहेत. प्रवाशांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा रोबो असो, टॅक्सी बोट असो की जड सामान सहज उचलून त्याचे योग्य वितरण करणारी मोठी यंत्रे.

हे सर्व चालविण्यासाठी मनुष्यबळ लागणारच आहे. अजून नवीन गोष्टी विकसित होत जातील आणि त्यानुसार तिथल्या रोजगारासाठी नवीन कौशल्यांची आवश्यकता भासत राहील. त्यात थेट यंत्रनिर्मिती, त्याची देखभाल यापासून ‘बॅक ऑफिस’च्या विविध सेवांचा समावेश असेल.

गरज कुशल मनुष्यबळाची

एकट्या चॅटजीटीपीने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत, त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. येत्या दोन तीन वर्षांत एआय आणि रोबोटिक्सचा वापर उद्योग क्षेत्रात वाढलेला दिसेल, त्यावेळी या क्षेत्राची माहिती असणारे कुशल मनुष्यबळ लागणार आहे, ते आतापासूनच तयार करावे लागेल. त्या दृष्टीने शैक्षणिक धोरणांमध्ये, अभ्यासक्रमात बदल आवश्यक आहेत.

AI opportunities for student education technology computer new changes
AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

रोबोटिक्स, ‘एआय’चा वापर भारतात वाढता आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठी गुंतवणूक करायला लागते. व्यावसायिक सहाजिकच नवीन गुंतवणूक करताना आपला खर्च कधी निघेल, याचा विचार करतो.

ऑटोमेशनचा निर्णय होतो, त्यावेळी त्याला ‘एआय’ आणि रोबोटिक्सचा निर्णय घ्यावाच लागतो. त्यासाठीची सोल्यूशन, सॉफ्टवेअर, मशिन ऑपरेटर अशा अनेक जणांची गरज पडणार आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या ही मोठी संधी ठरणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्ट्राँग एआय, लिमिटेड मेमरी, रिऍक्टिव्ह मशिन्स, थिअरी ऑफ माईंड व सेल्फ अवेअर असे विविध प्रकार आहेत. तंत्रज्ञान विकसित होताना ‘एआय’मध्येही बदल आणि विकास होत राहील. हे बदल स्टार्टअप, नोकरीसाठी संधी असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com