AIIMS Recruitment for Professor
AIIMS Recruitment for Professor

AIIMS मध्ये प्राध्यापक पदासाठी भरती, लगेच पाठवा अर्ज

AIIMS Recruitment 2022: मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
Summary

AIIMS Recruitment 2022: मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

AIIMS Recruitment 2022: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्समध्ये अनेक पदांच्या भरती करण्यात येणार आहे.. शैक्षणिक पदांसाठी AIIMS मध्ये ही भरती होणार आहे. AIIMS, गोरखपूर येथे 23 प्राध्यापक (गट A) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून आणि त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार AIIMS गोरखपूरच्या अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ट्यूटर / क्लिनिकल इन्स्ट्रक्टरसाठी अर्जदाराचे कमाल वय 35 वर्षे, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी कमाल वय 50 वर्षे आणि प्राध्यापक पदासाठी कमाल वय 55 वर्षे असावे.

मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जावरून उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

  1. प्रोफेसर कम प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग या पदासाठी लेव्हल-13 अंतर्गत 1,23,100 - 2,15,900 दरमहा पगार दिला जाईल.

  2. असोसिएट प्रोफेसर - रीडर इन नर्सिंग: लेव्हल-12 अंतर्गत तुम्हाला रु. 78,000-2,09,200 प्रति महिना पगार मिळेल.

  3. नर्सिंगमधील असिस्टंट प्रोफेसर / लेक्चरर: लेव्हल-11 अंतर्गत तुम्हाला67,700- 2,08,700 रु. प्रति महिनापगार मिळेल.

  4. ट्यूटर / क्लिनिकल इंस्ट्रक्टर: लेव्हल-10 अंतर्गत तुम्हाला 56,100-1,77,500 रु. प्रति महिना पगार मिळेल.

AIIMS Recruitment 2022: कसा करावा अर्ज

  1. aiimsgorakhpur.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. होम पेजच्या रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करा.

  3. सूचना डाउनलोड करा.

  4. अर्ज भरा आणि विहित पत्त्यावर पाठवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com