Air India : दहावी उत्तीर्णांना 'एअर इंडिया'मध्ये नोकरीची संधी

Air India Air Transport Services Limited च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Air India
Air Indiagoogle

मुंबई : एयर इंडिया एयर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने ने हॅंडीमॅन, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीतून एकूण 92 पदे भरली जाणार आहेत.

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाइट www.aiasl.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे. Air India Air Transport Services Limited (AIATSL)

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Air India
Apprentice Job : दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; ७९१४ जागांवर भरती

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 92

शैक्षणिक पात्रता

Air India Air Transport Services Limited च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणेही आवश्यक आहे.

Air India
Job Alert : १०वी-१२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांची वन संशोधन संस्थेत भरती

वय मर्यादा

या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 28 वर्षे, OBC साठी 31 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 33 वर्षे आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी भरती अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना मुलाखत, ट्रेड टेस्ट, पीईटी आणि स्क्रीनिंग या प्रक्रियेतून जावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com