esakal | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत फॅकल्टी पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत फॅकल्टी पदांची भरती!

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत फॅकल्टी पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences - AIIMS), रायपूरने प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 4 ऑक्‍टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), रायपूरसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्‍टोबर असून, थेट अर्ज करण्यासाठी https://www.aiimsraipur.edu.in/user/vacancies-faculty.php?pst=faculty या लिंकला क्‍लिक करा.

हेही वाचा: महिलांसाठी खुषखबर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती

या आहेत महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची तारीख - 20 सप्टेंबर 2021

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्‍टोबर 2021

ही रिक्त पदे भरली जाणार

 • प्राध्यापक : 37 पदे

 • अतिरिक्त प्राध्यापक : 31 पदे

 • सहयोगी प्राध्यापक : 52 पदे

 • सहाय्यक प्राध्यापक : 43

हेही वाचा: शाळा सुरू करण्याचा 'या' दिवशी निर्णय! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

जाणून घ्या पात्रता

 • प्राध्यापक : संबंधित विषयात MD / MS आणि M.Ch. तसेच 14 वर्षांचा अनुभव.

 • अतिरिक्त प्राध्यापक : संबंधित विषयात MD/MS आणि M.Ch. तसेच 10 वर्षांचा अनुभव.

 • सहयोगी प्राध्यापक : संबंधित विषयात MD/MS आणि M.Ch. तसेच सहा वर्षांचा अनुभव.

 • सहाय्यक प्राध्यापक : संबंधित विषयात MD/MS आणि M.Ch तसेच सहा वर्षांचा अनुभव.

जाणून घ्या वेतन

 • प्राध्यापक पदासाठी 2,20,000 रुपये

 • अतिरिक्त प्राध्यापक पदासाठी रु. 2,00,000 रुपये

 • सहयोगी प्राध्यापक पदासाठी 1,88,000 रुपये

 • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 1,42,506 रुपये

loading image
go to top