esakal | महिलांसाठी खुषखबर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी खुषखबर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) महिलांसाठी लवकरच विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे.

महिलांसाठी खुषखबर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services - TCS) महिलांसाठी लवकरच विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. टीसीएसच्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमातून ही भरती केली जाणार असून, Rebegin हा टीसीएसचा एक उपक्रम आहे. या उपक्रमातून प्रतिभावान महिला व्यावसायिकांना त्यांच्या कारकिर्दीला योग्य प्रेरणा मिळण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांना आता आयटी (IT) क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची तसेच नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे.

हेही वाचा: शाळा सुरू करण्याचा 'या' दिवशी निर्णय! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

सध्या टीसीएस अशा महिलांना ही जॉबची संधी देऊ इच्छित आहे, ज्यांना काही कारणास्तव आपला जॉब सोडावा लागला होता; मात्र, आता त्या पुन्हा जॉब करू इच्छितात. मात्र यासाठी त्यांच्याकडे कमीत कमी दोन वर्षांचा सलग आयटी सेक्‍टरमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. ज्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या कौशल्य आणि दृष्टिकोनातून जग बदलू शकतात, अशा प्रतिभावंत महिलांसाठी डिझाईन केलेले आमचे विशेष नियुक्ती उपक्रम सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असं टीसीएसने म्हटले आहे.

या वर्षी जूनमध्ये टीसीएसने 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली, जी कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक भरतींपैकी एक आहे. टीसीएसमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. कंपनीने असेही सांगितले, की आर्थिक भरपाईची गतीही समान राहील आणि या वर्षी 40 हजारांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल.

हेही वाचा: NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा!

Rebegin साठी असा करा अर्ज

प्रारंभी टीसीएसच्या करिअर पोर्टलवर जा. यानंतर Rebegin या लिंकवर क्‍लिक करा. यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्‍लिक करा. यानंतर Apply वर क्‍लिक करा.

ही आहे पात्रता

SQL Server DBA, Linux Administrator, Network Admin, Mainframe Admin, Automation Testing, Performance Testing Consultant, Angular JS, Oracle DBA, Citrix Administrator, Java Developer, Dotnet Developer, Android Developer, IOS Developer, Windows Admin, Python Developer and PL SQL यापैकी कोणत्याही कोर्समध्ये शिक्षण झालं असेल तर तुम्ही या जॉब्ससाठी अप्लाय करू शकता.

loading image
go to top