अ‍ॅमेझॉन देणार तुम्हाला जाॅब ; 'या' शहरांत असणार संधी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पुढील सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - आघाडीच्या ई-काॅमर्स कंपन्यांपैकी असलेल्या अ‍ॅमेझॉन इंडिया कंपनीने रविवारी कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अ‍ॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात नोकरी देण्यात येणार आहे. भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांनी कोणत्याही व्यत्यया विना सेवा देता यावी म्हणून अ‍ॅमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

कंपन्यांनी म्हटल्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहेत. कंपनीचा असा अंदाज आहे की, पुढील सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत देशभरातील काही शहरांमध्ये नव्या कामगाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. हैदराबाद, पुणे, कोईम्बतुर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदीगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये अँमेझॉन नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.

वाचा - पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 हजार पदांपैकी अनेक  अ‍ॅमेझॉनच्या 'वर्चुअल ग्राहक सेवा' कार्यक्रमाचा भाग असतील. यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.

पदांसाठी अशी लागेल पात्रता -

या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे. तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. भरती झालेल्या या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडियाचे संचालक अक्षय प्रभु यांनी सांगितलं की, 'आम्ही सतत वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी वाढत्या मागणीचे निरंतर मूल्यांकन करीत आहोत. पुढील सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या वाढेल असा आमचा अंदाज आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon India will provide temporary jobs in the customer service segment