
पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करत दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात तिघे जखमीही झाले आहेत. चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
कराची : पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करत दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात तिघे जखमीही झाले आहेत. चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांच्या माहितीनुसार, चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबारदेखील करण्यात आला. चार दहशतवाद्यांपैकी तिघांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर एक दहशतवादी अद्याप आतमध्ये लपला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच संपूर्ण परिसर सील केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
Two killed as terrorists attack Pakistan Stock Exchange in Karachi, people from the building being evacuated: Pakistan media pic.twitter.com/IUeqvtYyoz
— ANI (@ANI) June 29, 2020
दहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात एक पोलिस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.