इंजिनिअरींग संदर्भातील वेबिनार्सला उत्स्फुर्त प्रतिसाद; तुम्हीही घेऊ शकता सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Machine Engineering

इंजिनिअरींग संदर्भातील वेबिनार्सला उत्स्फुर्त प्रतिसाद; तुम्हीही घेऊ शकता सहभाग

अमृता विद्यापीठाकडून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. २८ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ८ वेबिनार होणार आहेत. अमृता विश्व विद्यापीठ, यंग इन्सिपरेटर्स नेटवर्क सकाळ प्रस्तुत 'Career Beyond CSE (Computer Science Engineering) for Engineering Aspirants या विषयावर हे वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: ऑटेमेशनमुळे करिअरमध्ये कसे होतील बदल? अमृता विद्यापीठाचा महत्त्वाचा वेबिनार

या वेबिनार्समधील दुसरा वेबिनार तिसरा वेबिनार हा 23 नोव्हेंबर रोजी पार पडला. 'हाऊ विल ऑटोमेशन चेंज द करिअर लँडस्केप' असा या वेबिनारचा विषय होता. यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत गिरभाने यांनी अनेक क्षेत्रांमध्ये करिअरची संधी आणि ऑटोमेशन कसं बदलत चाललं आहे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

तर ए. एम. आयिपदास यांनी म्हटलंय की, विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेशनमध्ये काम करण्याची चांगली सध्या भारतात उपलब्ध आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेझेंटेशन देखील दिलं आहे. या वेबिनारमध्ये अमृता विश्व विद्यापीठ, चेन्नई येथील मेकॅनिकल इंजिनिअरसह प्राध्यापक ए एम आयियपदास तसेच प्रशांत गिरभाने, डायरेक्टर जनरल, एम सी सी आय ए हे प्रमुख पाहुणे होते.

हेही वाचा: एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

या वेबिनार्समधील पुढचा वेबिनार हा मंगळवारी, ७ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या वेबिनारसाठी मेकॅनिकल इंजिनिरिंगमधील तज्ज्ञ गणेश काकंदीकर मार्गदर्शन करणार आहेत. अमृता स्कूल ऑफ इंजिनिरिंगचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर ए मनिकंदन देखील असणार आहेत. 'ई मोबिलिटी - फ्यूचर ऑफ इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन' या विषयावर हा वेबिनार होणार आहे.

loading image
go to top