Anganwadi Recruitment 2023 : अंगणवाडी सेविका-मदतनीससाठी शेकडो अर्ज पण जागा केवळ ६९

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास विभागातर्फे आष्टी तालुक्यात मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू
Anganwadi Worker
Anganwadi Workersakal

Ashti : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास विभागातर्फे आष्टी तालुक्यात मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया सुरू असून ७७ पैकी आठ जागांना स्थगिती देण्यात आल्याने ६९ जागा भरण्यात येणार असून यासाठी तब्बल ८०० अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती एकात्मिक बालविकास विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली.

आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असलेल्या व शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख सात जुलै देण्यात आली होती. त्यानुसार आष्टी तालुक्यातील विविध गावांमधून ६९ जागांसाठी ८०० महिलांनी अर्ज कार्यालयात दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

ता. १२ ते २० जुलै या दरम्यान आक्षेप मागविण्यात येणार असून आक्षेपांची पूर्तता केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ता. २१ जुलै रोजी उमेदवारांची निवड जाहीर केली जाणार आहे. ता. २२ रोजी मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

मिनी अंगणवाडी सेविका- अंगणवाडी मदतनीसच्या ६९ जागांसाठी ही निवड प्रक्रिया पार पडत असून ता. २२ जुलै रोजी मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २३ जुलैपासून कर्तव्यावर रुजू करून घेण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com