करिअर अपडेट : चॅटजीपीटीच्या साहाय्याने अॅनालिटिक्स

तुम्ही डेटाशी संबंधित काम करता का? किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही डेटावर अवलंबून असता का?
CHAT GPT
CHAT GPTsakal

- अंकित भार्गव

तुम्ही डेटाशी संबंधित काम करता का? किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही डेटावर अवलंबून असता का? आता चॅटजीपीटीच्या साहाय्याने ‘डेटा लाइफ सायकल’चे व्यवस्थापन करून त्या आधारे अनुमान काढणे हे सुलभ आणि भविष्यवेधी झाले आहे. त्यामुळे आता आपल्याला किचकट डेटा अॅनालिटिक्स अल्गोरिदमवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

डेटाच्या संदर्भात चॅटजीपीटीची वैशिष्ट्ये

डेटा अॅनालिसिस

तुमचा डेटा चॅटजीपीटीमध्ये फीड करू शकता. तो समजून घेणे, त्यातील मिसिंग व्हॅल्यू शोधणे, मेटाडेटा समजून घेणे, त्याआधारे काही निरीक्षणे नोंदविणे इत्यादी कामे चॅटजीपीटीच्या माध्यमातून करता येतात.

इनसाईट्स आणि शिफारशी प्राप्त करणे

‘रॉ डेटा’ फीड करून चॅटजीपीटीला पुढील आज्ञा द्या. ‘कृपया डेटा अनालिस्टचं काम करून मला खालील डेटासंदर्भात इनसाईट्स आणि शिफारशी उपलब्ध करून द्याव्यात.’ तुम्हाला ट्रेंड अॅनालिसीस, मिसिंग व्हॅल्युज, सरासरी, अॅक्शन आयटम्स इत्यादींचा समावेश असलेले अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष मिळतील.

डेटासेट्स शोधणे

स्वत:ला अॅनालिस्ट म्हणून प्रशिक्षित करायचे असल्यास आता वापरासाठी तयार असलेले डेटासेट्स मिळवणे सहज शक्य आहे. त्या आधारे तुम्ही विशिष्ट परिस्थितीजन्य विश्लेषण (हायपोथिसीस) करून त्याचे विविध उद्योगांशी संबंधित डेटावर परीक्षण करू शकता. उदा. हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी डायग्नोस्टिक लॅबचा शंभर ओळींचा डेटासेट तयार करा.

मेटाडेटा समजून घेणे

चॅटजीपीटीमध्ये डेटा फीड करून त्यामधून डेटा संदर्भात माहिती प्राप्त करू शकता. तसेच या माध्यमातून प्रोग्रॅमर किंवा ग्राहक यांना डेटाची माहिती मिळावी यासाठी डेटासेटमधील प्रत्येक डेटापॉइंटचा तपशीलदेखील प्राप्त केला जाऊ शकतो. एका वैविध्यपूर्ण टीमसाठी हे डॉक्युमेंटेशन अत्यंत फायदेशीर आणि वेळ वाचवणारे ठरते.

कोड लिहिणे आणि ऑप्टिमाईझ करणे

चॅटजीपीटीच्या साहाय्याने आपण रिलेशनल आणि नॉन रिलेशनल डेटाबेससाठी कोड लिहू शकतो. त्यामुळे अपेक्षित डेटासेटवर प्रक्रिया करणे सुलभ होते. तसेच यामुळे प्रोग्रॅमर्सच्या कामाचे प्रमाण कमी होते.

अनस्ट्रक्चर्ड डेटा समजून घेणे

चॅटजीपीटीमध्ये एखादा ब्लॉग किंवा आर्टिकल फीड करून त्याचे विश्लेषण करता येते. तसेच या लेखनातून सकारात्मक किंवा नकारात्मक यांपैकी कोणता भाव प्रसारित होतो हेदेखील समजून घेता येते. चॅटजीपीटीच्या माध्यमातून लेखन वाचणे, त्याचे विश्लेषण करणे आणि लेखनाची सकारात्मकता किंवा नकारात्मकता यांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणे इत्यादी कामे करणे शक्य आहे.

डेटा हे नव्या युगातील सोने आहे. त्यामुळे आपण सर्वांनी डेटा व्यवस्थितपणे समजून घेणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. अगदी नवीन वापरकर्ते असोत किंवा डेटा अॅनालिस्ट्स, डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी चॅटजीपीटीच्या माध्यमातून सर्वांना मदत मिळू शकते.

आपली खासगी किंवा गोपनीय माहिती चॅटजीपीटीसमवेत शेअर करू नका. ती माहिती शेअर करण्यासाठी चॅटजीपीटीमध्ये पर्सनल इन्स्टन्स तयार करा किंवा वन टाइम एन्व्हायर्न्मेंट सेटअप करून त्याचा वापर करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञाची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com