Nano Satellite
Nano Satelliteesakal

Nano Satellite : 'डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय' करणार नॅनो सॅटेलाईटचं प्रक्षेपण; ISRO चं लाभणार सहकार्य

अशा प्रकारे सॅटेलाईट प्रक्षेपित करणारे हे महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय ठरेल.
Summary

महाविद्यालयातील सर्व सोयींनी युक्त इमारती व प्रयोगशाळा पाहूनच नॅनो उपग्रह तयार करण्यासाठी इस्त्रोचे सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाळवा : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय (Annasaheb Dange College of Engineering) ‘इस्त्रो’च्या (isro) सहाय्याने स्वतःचा नॅनो सॅटेलाईट (Nano Satellite) प्रक्षेपित करणार आहे. अशा प्रकारे सॅटेलाईट प्रक्षेपित करणारे हे महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय ठरेल. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जून २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. ही माहिती इस्त्रोच्या बंगळूर येथील यू. आर. राव सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. आर. कनाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. शर्मा म्हणाले, ‘‘डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यात संशोधनवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी इस्त्रोच्या सहकार्याने येत्या जूनपासून नॅनो उपग्रह तयार करण्यास सुरवात केली जाईल. यामध्ये सर्व विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांचा एक गट तयार केला जाईल. अखंड तीन वर्षे हे काम सुरू राहील. यासाठी इस्त्रोकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल. असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच खासगी महाविद्यालय (Private college) असेल. या उपग्रहाचा वापर देशासह परदेशातील अन्य संस्थांना त्यांचे संशोधन सुरू ठेवण्यासाठीही करता येईल.’’

Nano Satellite
आयटी कंपन्या कोल्हापूरला आणण्यासाठी मी मदत करतो; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांचं आश्वासन

ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील सर्व सोयींनी युक्त इमारती व प्रयोगशाळा पाहूनच नॅनो उपग्रह तयार करण्यासाठी इस्त्रोचे सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे.’’ अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाबींमध्ये महाराष्ट्रात अग्रस्थान मिळवले आहे. आमच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाने पुणे विभागातून गुणवत्तेबाबत प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘नॅक’कडून ए ++ मानांकन मिळविणारे ग्रामीण महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. फार्मसी कॉलेज ‘नॅक’कडून ए + मानांकन मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व देशातील दहावे महाविद्यालय ठरले आहे.

Nano Satellite
ऑलिम्‍पिकपासून ते एशियनपर्यंत.. कोल्हापूरच्या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; मिळवली 'इतक्या' कोटींची बक्षिसं

कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, ‘‘या उपग्रहासाठी दीड ते दोन कोटी रुपयेएवढा प्रचंड खर्च अपेक्षित आहे. परंतु मुलांच्या कौशल्यविकासासाठी व त्यांच्या संशोधनवृत्तीस चालना देण्यासाठी संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करेल. आज आपल्या देशाला उद्योजकांची व शास्त्रज्ञांची आवश्‍यकता आहे. आमचे विद्यार्थी इस्त्रोच्या सहकार्याने नॅनो उपग्रह तयार करणार, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’

डॉ. शर्मा यांनी चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, मंगळयान, आदित्य-एल १ या सर्व मोहिमांची विस्तृत माहिती दिली. तसेच इस्त्रोच्या गगनयान, सूर्ययान या भविष्यातील प्रकल्पांबद्दल चर्चा केली. इस्त्रोकडून सध्या रोबो अंतराळामध्ये पाठवण्याचे प्रयोग सुरू आहेत. हा प्रयोग डिसेंबर-२०२४ अखेर पूर्णत्वास जाईल. त्यानंतर भारतीय अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठविण्याबद्दल कार्यवाही सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.विक्रम पाटील, डॉ. शैलेंद्र हिवरेकर, डीन डॉ. अभिजित जाधव, प्रा. किरणबाबू, प्रशासकीय अधिकारी दीपक अडसूळ उपस्थित होते.

Nano Satellite
'काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी पेकाटात लाथ घालायची भाषा करू नये'; उदय सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

‘विद्यार्थी, शिक्षक एकत्रित काम करणार’

या प्रकल्पात विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित काम करतील. या दोन्ही घटकांच्या कौशल्यविकासाला याद्वारे प्रोत्साहन दिले जाईल, असे यू. आर. राव सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्म म्हणाले. डॉ. शर्मा यांनी इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमा, आदित्य-एक, गगनयान, मंगलयान या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com