Anthropic मध्ये मानवी लेखकासाठी तब्बल ३.२ कोटींची नोकरी; AI कंपनीनेच अधोरेखित केले मानवी कौशल्याचे महत्व!

Anthropic Hiring Human Writer: एआय क्षेत्रात मानवी कौशल्याचे महत्त्व कायम; तंत्रज्ञानाच्या युगात 'एक्झिक्युटिव्ह कम्युनिकेशन्स रायटर'साठी अँथ्रॉपिककडून तब्बल ३.२५ कोटींपर्यंतच्या पगाराची ऑफर...
Anthropic Offers Rs 3.2 Crore Salary Package to Hire Human Writer

Anthropic Offers Rs 3.2 Crore Salary Package to Hire Human Writer

esakal 

Updated on: 

Anthropic Hiring Human Writer: ज्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) फक्त काही सेकंदांत संपूर्ण भाषणे, लेख आणि मजकूर तयार करत आहे, त्याच काळात प्रसिद्ध एआय कंपनीने मानवी बुद्धिमत्ता आणि लेखन कौशल्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे. 'क्लॉड' (Claude) हा जगप्रसिद्ध एआय चॅटबॉट विकसित करणाऱ्या 'अँथ्रॉपिक' (Anthropic) या कंपनीने एका मानवी लेखकासाठी (Human Writer) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी कंपनी वार्षिक तब्बल ३.२ कोटी रुपयांहून अधिकचे भरभक्कम पगार पॅकेज देण्यास तयार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com