
...म्हणून 'अॅपल'चे कर्मचारी नोकरी सोडण्याचा विचार करतायत
मुंबई : Apple कंपनीच्या कर्मचाऱ्य़ांना सध्या आठवड्यातून एकदा कार्यालयात जाऊन काम करणे बंधनकारक आहे. २३ मेपासून आठवड्यातून तीनदा कर्मचाऱ्यांना कार्यालयात यावे लागेल, असे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी सांगितले आहे. कार्यालयात येऊन काम करण्याच्या कंपनीच्या धोरणाला ७६ टक्के कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे.
हेही वाचा: अॅपल वॉच ६, अत्याधुनिक आयपॅड सादर
१३ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत एका संस्थेने एक सर्वेक्षण हाती घेतले होते. यात त्यांना ६५२ अॅपल कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यातील बहुतांशी कर्मचारी कार्यालयात जाऊन काम करण्याच्या धोरणाच्या विरोधात असून यासाठी ते अॅपल सोडून अन्य कंपनीत काम करण्याचा विचार करत आहेत.
हेही वाचा: किशोर पटेल यांची 'अॅपल बेर'ची यशोगाथा!
गेली दोन वर्षे एप्रिलच्या मध्यापर्यंत बहुतांशी अॅपल कर्मचारी पूर्णपणे घरून काम करत होते. पण आता पुन्हा कार्यालयात जायचे असल्यास प्रवासाच्या अडचणी जाणवत असल्याचे बहुतांश कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कामाबाबत अधिक लवचीक धोरण असणाऱ्या अन्य एखाद्या कंपनीत संधी शोधत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
सर्वेक्षणानुसार ५६ टक्के कर्मचारी अॅपल सोडण्याचा विचार करत आहेत. ही गोष्ट अॅपलसाठी नवीन नाही. अॅपलच्या विविध विक्री केंद्रांवर काम करणारे कर्मचारीही कामाचा ताण आणि मोबदला यांना वैतागला आहेत.
Web Title: Apple Employees To Quit Job Due To Return To Office Policy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..