‘पीएच.डी.’च्या प्रवेश परीक्षेस अर्ज करण्याच्या मुदतीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
Pune University
Pune Universitysakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता.७) पीएच.डी. च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयीन संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले किंवा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ‘पीएच. डी.’ अभ्यासक्रमासाठी ६ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.

‘पीएच.डी’साठी किती जागा विभागनिहाय उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती विद्यापीठाने यापूर्वीच परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण तीन हजार १८७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी सुरवातीला उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल, त्यानंतर मुलाखत होऊन त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एम. फिल, नेट, पेट २०२१ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ही परीक्षा न देण्याची सवलत देण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती ‘https://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx’ या लिंकवर उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com