डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती! 'या' तारखेपासून करा अर्ज

डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती! "या' तारखेपासून करा अर्ज
DRDO
DRDOCanva
Summary

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

Summary

सोलापूर : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (Defense Research and Development Organization - DRDO) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण 110 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://rac.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 असेल. अर्जदारांनी लक्षात घ्यावे, की शेवटची तारीख संपल्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

DRDO
नॅशनल फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरीची संधी!

डीआरडीओने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 110 पदांपैकी पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या 50 आणि तंत्रज्ञ पदविकाच्या 30 पदांची नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षित अप्रेंटिसच्या 26 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, नमूद केलेल्या रिक्त पदांची संख्या केवळ सूचक आहे आणि प्राप्त पात्र अर्जांच्या अंतिम मूल्यांकनावर आधारित नंतरच्या टप्प्यावर बदलू शकते.

अशा प्रकारे निवड होईल

आवश्‍यक पात्रता स्तरावर प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर उमेदवारांची निवड अप्रेंटिसच्या पदांसाठी केली जाईल. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हर्च्युअल) पद्धतीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सामील होताना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी मोबाईल / पेन ड्राइव्ह / लॅपटॉप / इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे / कॅमेरा आणण्याची परवानगी नाही. निवडलेल्या उमेदवारांना हे लक्षात घ्यावे लागेल, की प्रशिक्षण कालावधी 12 महिन्यांचा असेल.

DRDO
महाविद्यालयांमध्ये केवळ 77 टक्के विद्यार्थ्यांचीच हजेरी !

लेखी परीक्षा / मुलाखतीसाठी प्रवेश पत्रासंदर्भातील माहिती लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल. पुढे, आयटीआर उमेदवारांना लेखी चाचणी / मुलाखत कॉल लेटरची कोणतीही हार्डकॉपी पाठवण्यात येणार नाही. अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रवेशपत्र / कॉल लेटर प्राप्त करणे, डाउनलोड करणे आणि प्रिंट करणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com