esakal | आर्मीत नोकरीची मोठी संधी! 10 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज I Indian Army
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Recruitment 2021

कमांड सिग्नल रेजिमेंटनं ट्रेड्समन अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय.

आर्मीत नोकरीची मोठी संधी! 10 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Army Recruitment 2021 : कमांड सिग्नल रेजिमेंटनं ट्रेड्समन अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. यात बाबरची, धोबी, न्हावी, सफाई कामगार आणि मेसेंजर या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया 25 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 निश्चित करण्यात आलीय.

दरम्यान, इच्छुक उमेदवार आपला अर्ज आणि कागदपत्रे कमांडिंग ऑफिसर, ईसीएसआर, फोर्ट बिलियम, कोलकाता -700021 या पत्त्यावर अंतिम तारखेपर्यंत पाठवू शकतात. या कागदपत्रांसोबतच अर्जदारांना त्यांची पाच पासपोर्ट आकाराची छायाचित्रेही पाठवावी लागतील. मात्र, ही छायाचित्रे तीन महिन्यांपेक्षा जुनी नसावीत.

Indian Army Recruitment : रिक्त जागा

बाबरची

वेतनमान : 19900-63200 रुपये (स्तर-2)

पदांची संख्या : 02

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून मॅट्रिक पदवी व भारतीय स्वयंपाक व्यवसायात प्राविण्य आवश्यक आहे.

धोबी

वेतनमान : 18000-56900 रुपये (स्तर -1)

पदांची संख्या : 03

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून मॅट्रिक आवश्यक आहे.

हेही वाचा: भारतीय तटरक्षक दलाचे Admit Card जारी; 'या' पदांवर होणार भरती

न्हावी

वेतनमान : 18000-56900 रुपये (स्तर -1)

पदांची संख्या : 02

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून मॅट्रिक व न्हावी कामाचा अनुभव गरजेचा आहे.

सफाई कामगार

वेतनमान : रुपये 18000-56900 रुपये (स्तर -1)

पदांची संख्या : 02

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून मॅट्रिक व सफाई कामाचा अनुभव आवश्यक आहे.

संदेशवाहक

वेतनमान : 18000-56900 रुपये (स्तर-1)

पदांची संख्या : 01

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून मॅट्रिक आवश्यक असून कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा, टायपिंग स्पीड आणि कॉम्प्युटर अॅप्लिकेशनचे ज्ञानही गरजेचे आहे.

हेही वाचा: खुशखबर! PWD विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांवर लागणार लाॅटरी

वयोमर्यादा : 1 सप्टेंबर 2021 रोजी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे.

भरती प्रक्रिया : सामान्य जागरूकता, सामान्य इंग्रजी, संख्‍यात्‍मक अभिक्षमता आणि सामान्‍य बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झालेल्या अर्जदारांच्या व्यावहारिक ज्ञानाचे मूल्यांकन केले जाईल. दोन्ही परीक्षांनंतर अर्जदारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

loading image
go to top