संधी करिअरच्या  : कौशल्यप्रधान अभ्यासक्रमातील संधी 

grafic-design
grafic-design

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा नीट विचार केल्यास युवावर्ग कौशल्य प्रणित असला पाहिजे. यामुळे तो आत्मनिर्भर बनू शकतो आणि यासाठी विद्यार्थ्यांनी परंपरागत शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची निवड करावी लागणार आहे. 

सध्या डिझाइन या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, तसेच स्टार्टअपसाठीही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चित्रकला या विषयाला आपल्या एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये दुय्यम स्थान राहिले आहे, मात्र हाच विषय आता अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडवत आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, आर्ट्स, लॉ यांप्रमाणेच डिझाइन या विषयांमध्ये देखील आता करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. डिझाईन क्षेत्रात आपल्या कलेचा आनंद घेणे आणि आपल्या आवडीच्या विषयात करिअर करणे ही या क्षेत्राची जमेची बाजू आहे. हीच नेमकी गरज ओळखून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने गेल्या तीन ते चार दशकांपासून कौशल्यावर आधारित कोर्सेसची सुरुवात फर्ग्युसन महाविद्यालयांमधील जगन्नाथ राठी व्होकेशनल गाईडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत केली आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलवर आधारित शिक्षण दिले जाते. 

डिझाईनच्या कोर्सेसमधील करिअर संधी 

१. इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन- 
या क्षेत्रामध्ये आपण घरातील अंतर्गत सजावट किंवा कमर्शियल जागेतील म्हणजेच ऑफिसेस, शॉप, मॉल्स, सिनेमागृह किंवा काही सार्वजनिक ठिकाणे यांतील अंतर्गत फर्निचरची रचना व डिझाईन कसे असावे, तसेच उत्तम वातावरण निर्मितीसाठी रंगसंगती कशी असावी हे पाहिले जाते. पलब्ध जागेमध्ये आकर्षक फर्निचर, लाईट इत्यादीची रचना करणे, एस्टिमेट आणि कोटेशन्स काढणे या सर्व गोष्टींचाही यात समावेश होतो. हे शिकताना उपलब्ध जागेमध्ये डिझाईनची रचना कशी असेल याचे ड्रॉइंग काढून देणे, त्याचे वेगवेगळे पर्याय देणे, यामुळे ग्राहकांना आपल्या जागेमध्ये नेमके कसे डिझाईन असणार आहे याचा अंदाज येतो. 

२. लॅण्डस्केप डिझाईन- 
लँडस्केप डिझाईन स्वतंत्र व्यवसाय आणि कला परंपरा आहे. लँडस्केप डिझायनर्सद्वारे केल्या जाणाऱ्या रचना निसर्ग आणि संस्कृती एकत्रित करतात. समकालीन प्रॅक्टिसमध्ये लँडस्केप डिझाईन हे लँडस्केप आर्किटेक्चर आणि गार्डन डिझाइनमधील दुवा आहे. 

इंटिरिअर डिझाईनमध्ये घरामधील किंवा कमर्शिअल जागेमधील अंतर्गत सजावटीचा समावेश असतो, तसा लँडस्केप डिझाईनमध्ये घर किंवा कमर्शियल जागेमधील बाह्य सजावटीचा समावेश होतो. यामध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी झाडे रोपे यांची माहिती, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गार्डनचे डिझाईन्स कसे असावे, हे शिकायला मिळते. यामध्ये जागा विकसित करणे तिथे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स करणे या सर्व गोष्टींचा समावेश असतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३. ग्राफिक अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन - 
ग्राफिक डिझाईन म्हणजे टायपोग्राफी, छायाचित्रण, प्रतिमालेखन आणि चित्रांच्या वापराद्वारे व्हिज्युअल संवाद आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया. हे फील्ड व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन डिझाईनचा एक भागच आहे. लोगो, ब्रँडिंग, पॅकेजिंग, ब्रोशर इत्यादी गोष्टींचे डिझाईन करणे, तसेच जाहिरातींची वेगवेगळी माध्यमे तयार करणे या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. 

या क्षेत्रासाठी क्रिएटिव्हिटी, ब्रेनस्टॉर्मिंग यासारख्या ॲक्टिव्हिटी यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एखाद्या वस्तूची आकर्षकता वाढवणे आणि जाहिरातीद्वारे ती ग्राहकापर्यंत पोचवणे हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये ॲडव्हर्टायझिंग कंपनी, आयटी क्षेत्र, वेब डिझाईन, स्वतःचा व्यवसाय, प्रिंटिंग प्रेस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com