भविष्य नोकऱ्यांचे : माहिती वेचणी तंत्र

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 7 May 2020

माहिती वेचणी तंत्राच्या शेवटच्या पायरीविषयी या लेखात बोलूया. माहिती वेचणी तंत्राच्या शेवटच्या पायरीविषयी या लेखात बोलूया. या पायरीवर आपण वेचलेल्या माहितीची ज्ञात स्रोतांबरोबर जोडणी करण्याचा प्रयत्न करतो. अशी जोडणी केल्याने आपल्याला नवीन ज्ञानाची उकल करणे सोपे जाते.

सुरुवातीला आपण या जोडणीचे एक उदाहरण पाहू. या लेखात आपण कोरोनापासून फारकत घेऊन बहुसंख्यकांच्या आवडीच्या क्रिकेटमधील उदाहरण घेऊया. समजा आपल्याला क्रिकेट समालोचन दृश्य स्वरूपात दाखवायचे आहे किंवा एखाद्या लेखात उल्लेख असलेल्या क्रिकेटपटूंबद्दल अधिक माहिती शोधायची असेल, तर आपण क्रिकेटबद्दलची  माहिती  साठविणाऱ्या माहिती कुंभामध्ये ती शोधून  काढण्याचा प्रयत्न करतो. आता हेच काम खूप क्रिकेटपटूंच्या बाबतीत करायचे झाल्यास ते खूपच कटकटीचे असेल. अशा गोष्टी संगणकाच्या माध्यमातून परस्पर करता आल्या तर ते फारच सोपे आणि सुटसुटीत होईल.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदा - एखाद्या लेखात आपण केन विलियम्ससनचा उल्लेख आढळला आणि आपल्याला हा उल्लेख क्रिकइन्फोच्या माहिती कुंभातील केन विलियम्ससनच्या नोंदणीसोबत जोडता आला, तर आपल्याला या क्रिकेटपटूंविषयी सर्व माहिती क्षणार्धात उपलब्ध होते.

आणि आपल्याला लेखामध्ये आलेला ‘केन स्टुअर्ट विल्यमसन’ हा उल्लेख या नोंदणीशी जोडायचा आहे. आता ही जोडणी नेमकी कशी करता येईल हे पाहूया.  आपल्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, आपल्याला लेखातील उल्लेख आणि माहिती कुंभातील नोंदणी यांच्यातील साम्य शोधून काढावे लागेल. हे साम्य शोधण्यासाठी आपल्याला नोंदणी वैशिष्टये आणि उल्लेखाचा लेखामधील संदर्भ यांचा वापर करता येऊ शकेल.

यासाठी आपण वर्गीकरणपद्धतीचा वापर करतो.मागील चार लेखात आपण माहिती वेचणी तंत्राबद्दल वाचले. हे तंत्र माहितीची वेचणी करण्यासाठी फारच उपयुक्त आहे. यामध्ये पुन्हा तालीम संच तयार करणे, वेगवेगळ्या माहिती सूची बनविणे, माहिती तंत्र प्रणाली विकसित करणे आणि त्या महाजालाच्या किंवा भ्रमणध्वनी (मोबाईल) अनुप्रयोगच्या (ॲप) माध्यमातून  वापरकर्त्यांपर्यंत पोचविणे यासारख्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेसाठी अशा प्रणाली काही प्रमाणात उपलब्ध आहेत, प्रादेशिक भाषांमध्ये अशा प्रणाली विकसित केल्यास त्याचा लाभ मोठ्या लोकसंख्येला होऊ शकेल.

लेखातील संदर्भ सर्व साधारणपणे असा दिसतो
केन स्टुअर्ट विल्यमसन (जन्म August ऑगस्ट १ १९९० १९९० ०) हा न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे जो सध्या सर्वच स्वरूपात न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. तो उजवा हाताचा फलंदाज आणि अधूनमधून ऑफ स्पिन गोलंदाज आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dr aashish tendulkar on Information marketing techniques