भविष्य नोकऱ्यांचे : माहिती संकलन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 6 February 2020

शाळा विविध घटक चाचण्या आणि सहामाही किंवा वार्षिक परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी माहिती गोळा करते. हे मनुष्यबळाकरवी केल्या जाणाऱ्या संकलनाचे एक उदाहरण आहे. याशिवाय शाळा, विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता इत्यादी बाबींचीही नोंद ठेवते.

मागील लेखात आपण साधन शिक्षणाच्या विविध प्रकारांबद्दलची माहिती घेतली. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, की पर्यवेक्षी साधन शिक्षणसाठी तालीम संच हा एक महत्त्वाचा घटक आहे. या लेखात आपण तालीम संच कसा गोळा केला जातो, ते पाहू. कोणत्याही व्यवसायाच्या कामकाजाचा भाग म्हणून विविध प्रकारची माहिती गोळा केली जाते. ही माहिती कधी स्वयंचलित प्रणालीच्या साह्याने तर कधी मनुष्यबळाकरवी संकलित केली जाते. उदाहरणार्थ- टॅक्सी कंपनी मूळ आणि गंतव्य स्थान दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा वेळ संकलित करते. प्रणालीमार्फत केल्या जाणाऱ्या संकलनाचे उदाहरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाळा विविध घटक चाचण्या आणि सहामाही किंवा वार्षिक परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी माहिती गोळा करते. हे मनुष्यबळाकरवी केल्या जाणाऱ्या संकलनाचे एक उदाहरण आहे. याशिवाय शाळा, विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता इत्यादी बाबींचीही नोंद ठेवते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार

माहिती संकलन हे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी फार महत्त्वाचे पूरक  क्षेत्र आहे. अशा माहितीअभावी कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त करणे निव्वळ अशक्य आहे. या क्षेत्रात नोकरीच्या उपलब्ध संधी.

संकलित माहिती तालीम संच म्हणून वापरायची असल्यास त्यात काही बदल करावे लागतात ते बदल ETL प्रणालीद्वारे करण्यात येतात. या कामामध्ये ETL आज्ञावली तज्ज्ञांची गरज भासते.  

या व्यतिरिक्त माहिती दृश्य स्वरूपात पाहण्यासाठी Data Visualization या तंत्राचा वापर केला जातो. उपलब्ध माहितीचे पृथ्थकरण करण्यासाठी किंवा प्रारूप बनविण्यासाठी सांख्यिकी क्षेत्रातील तंत्रांचा वापर केला जातो. या सर्व कामासाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज लागते. तालीम संचातील उदाहरणांना योग्य शिक्का देण्यासाठी त्या ठराविक क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज लागते. अशा उदाहरणामुळे तालीम संच अधिक सक्षम होतो आणि असा संच अधिक प्रभावीपणे कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या व्यतिरिक्त माहिती संकलनामध्ये वेब आणि अँप विकासक फार महत्त्वाची भूमिका बजावतात. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती संकलन क्षेत्रामध्ये फार मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar