भविष्य नोकऱ्यांचे : नवयुगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग

Vehicle
Vehicle

आपण आज नवयुगातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनांबद्दल चर्चा करणार आहोत. यातील काही उपयोजने अद्‍भूत वाटावी अशीच आहेत.

1) स्वयंचलित मोटारगाडी
आपल्या सर्वांना रस्त्यांवरील रहदारीतून मोटारगाडी चालवणे खूप जिकरीचे वाटते (अर्थात, हे सर्व वर्णन कोरोनापूर्व काळातील आहे!) अशावेळी आपल्याला कोणी स्वयंचलित मोटारगाडी दिल्यास काय मजा येईल! आता ही स्वयंचलित मोटारगाडी स्वप्नावस्थेतून प्रत्यक्षात उतरली आहे. काही पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेतील काही राज्यांत अशा प्रकारची गाडी रस्त्यावर धावताना दिसते. वेगवेगळ्या मोटार कंपन्या आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी यात चांगलीच आघाडी घेतली आहे. यात गुगल, टेस्ला, उबर यांसारख्या  कंपन्या आघाडीवर आहेत. गुगलची स्वयंचलित मोटार कॅलिफोर्निया आणि ॲरिझोना राज्यांत प्रत्यक्षात रस्त्यांवर धावताना दिसते. या स्वयंचलित प्रणालीच्या गाड्यांची आत्तापर्यंत काही लाख मैल प्रवास सार्वजनिक रस्त्यांवरून सुरक्षितपणे केला आहे. आपल्या सर्वांना प्रश्‍न पडला असेल की, या स्वयंचलित गाड्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध काय?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वयंचलित चालणाऱ्या गाडीला मनुष्यरुपी सारथी गाडी हाकण्यासाठी जे काही करतो, ते सर्व करावे लागते. समोरून येणारे अडथळे, पादचारी, इतर वाहने यांची नोंद घ्यावी लागते आणि त्यानुसार गाडी हाकण्याचे नियोजन करावे लागते. त्यासाठी या वाहनांमध्ये विविध प्रकारचे सेन्सर लावलेले असतात आणि काही विशिष्ट प्रकारचे कॅमेरेही लावलेले असतात. यातून मिळणाऱ्या माहितीतून किंवा संदेशांमधून आजूबाजूच्या अडथळ्यांविषयीचा अंदाज बांधला जातो आणि त्यायोगे गाडी हाकण्याची क्रिया केली जाते. यामध्ये संगणक दृष्टी (कॉम्प्यूटर व्हिजन) आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग या तंत्रांचा वापर केला जातो.  

2) बनावट छायाचित्रे आणि चित्रफिती
आजच्या युगामध्ये आपण बनावट बातम्यांविषयी (फेक न्यूज) मोठ्या प्रमाणावर ऐकतो. या बनावट बातम्यांमुळे मोठे अनर्थही घडताना आपण पाहिले आहेत. या बातम्या लिखित स्वरूपातील किंवा बनावट छायाचित्रे अथवा चलचित्र स्वरूपातील असतात. छायाचित्र आणि चलचित्रांसाठी विशिष्ट संगणक प्रणालींचा वापर केला जातो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अशा प्रकारचे बनावट छाया किंवा चलचित्रे बनविणे सोपे झाले आहे. मध्यंतरी मोनालिसा या प्रसिद्ध चित्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ओठ हलवून बोलते केले गेले. इंग्लंडच्या निवडणुकींच्या दरम्यान बोरिस जॉन्सन यांचा असाच बनावट व्हिडिओ किंवा चित्रफीत आली होती. यामागे ‘डीप फेक’ नावाच्या तंत्रांचा वापर केला जातो. हे ‘डीप फेक’ तंत्र विविध चित्रफितीवरून माणसांच्या देहबोलींचा अभ्यास करते, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आणि मग निव्वळ छायाचित्रावरून एखाद्या माणसाची चित्रफीत बनावट येते. आहे ना गंमत! हे एक दुधारी तंत्रज्ञान आहे. याचा वापर आपण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कारणासाठी करू शकतो. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com