भविष्य नोकऱ्यांचे : दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

intelligence in daily life
intelligence in daily life

मागील लेखामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची रोजच्या वापरातील काही उदाहरणे बघितली. या लेखामध्ये अजून काही उदाहरणे बघूया. अपेक्षा आहे की, या उदाहरणांवरून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची अनेक उपयोजने शोधून काढाल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील भागात आपण भ्रमणध्वनी आणि ई-मेल संदर्भातील कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयोजने बघितली. आताच्या युगात, कोरोना काळात अधिकच, आपण सर्रासपणे ई-शॉपिंग करतो. किराणा माल, कपडे, पादत्राणे, पुस्तके, खाद्यपदार्थ आणि अनेक गोष्टी! या सर्व प्रणालींवर आपल्याला ‘अजून या वस्तू आवडतील’ (You may like)  असा एक भाग असतो. अशाच प्रकारचा भाग आपल्याला समाज माध्यमांवरही दिसतो. तिथे काही व्यक्तींची आपल्याला शिफारस केलेली असते. अशीच शिफारस मित्र, नोकरी, बातमी, सिनेमा, चलचित्रे, छायाचित्रे, गाणी  या सर्वच बाबतीत वेगवेगळ्या माध्यमातून आढळून येते. आपल्या आवडीचा अभ्यास करून संगणक प्रणाली आपले ठरावीक रेखांकन बनवीत असतात.

या रेखांकनावरून आपल्याला या शिफारशी दिल्या जातात. आपल्या रेखांकनावरून आपल्यासारखेच इतर उपयोगकर्ते शोधले जातात आणि या समूह-सवयीनुसार या शिफारशी दिल्या जातात. अनेक वेळा या शिफारशी आपल्याला खूपच उपयुक्त ठरतात आणि त्या प्रणालीला हे कसे कळले याविषयी आपल्या मनात कुतूहल असते. अशा प्रकारच्या योग्य शिफारशीवरून या प्रणाली आपली व्यवसाय वृद्धी करतात. या तंत्राला ‘Recommendation System’ असे संबोधले जाते. साधन शिक्षणाव्यतिरिक्त लिनिअर अलजेब्रामधील मॅट्रिक्स या संकल्पनेचा वापर मोठ्या प्रमाणावर या तंत्रामध्ये केला जातो. आपण या शिफारस देणाऱ्या प्रणाली यू- ट्यूब, ट्विटर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, लिंक्डइन, फेसबुक, आणि अगदी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळांवर अनुभवतो. ई-सकाळच्या संकेत स्थळावर, जिथे आपल्याला आपल्या आवडीच्या बातम्यांची शिफारस केली जाते, त्यामागेही अशाच शिफारस प्रणाली कार्यरत असते.

आपण आपली छायाचित्रे छायाचित्रांचे व्यवस्थापन करणाऱ्या संगणक प्रणालीमध्ये टाकल्यावर ही प्रणाली आपले चेहरे चिन्हांकित करतात, तसेच त्यांना ओळखूही शकतात. या मागे ‘संगणक दृष्टी’ या तंत्रांचा वापर केला जातो. या दशकात या क्षेत्रात वेगाने संशोधन होऊन आज संगणक प्रणाली आपल्यापेक्षा अधिक स्पष्टतेने विविध वस्तू पाहू आणि ओळखू शकतात. 

पुढील भागात आणखी अशीच काही उदाहरणे पाहू. या व्यतिरिक्त येणाऱ्या काळात या तंत्राचा कशाप्रकारे वापर होईल, त्याची चर्चा करूया. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com