जपान आणि संधी : जपानी भाषा प्रमाणपत्र

Learn-Japanese
Learn-Japanese

आपण आज जपानी भाषेची जगभर वैध असलेली विविध प्रमाणपत्रे पाहूया. जपान फाउंडेशन ही परीक्षा आयोजित करणारी एक संस्था आहे.   

जपानी भाषा प्रावीण्य परीक्षा म्हणजे  काय? 
जपानी भाषा प्रावीण्य परीक्षा ही जपान व इतर देशात जपानी भाषा शिकणाऱ्या व्यक्तींचे भाषा कौशल्य मूल्यांकन व प्रमाणित करण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा आहे. या परीक्षांना जेएलपीटी (Japanese Language Proficiency Test) असे म्हणतात.

ही परीक्षा देण्यासाठीची पात्रता 
मूळचे जपानी नसलेले, जपानी भाषा बोलू शकणारे सर्वजण ही परीक्षा देऊ शकतात. यासाठी कुठलीही वयोमर्यादा नसते. जपानी नागरिकत्व धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी पात्रता वाढवली जाते. पाचवीच्या पुढच्या सर्व विद्यार्थ्यानी ही भाषा शिकावी, कारण या भाषेमुळे खूप संधी उपलब्ध होतील.

परीक्षेचा कालावधी 
जपानमध्ये वर्षातून २ वेळा, जुलै आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी, जपान बाहेरील देशातील काही शहरात ही परीक्षा वर्षातून एकदा किंवा दोन वेळा जपान प्रमाणेच जुलै किंवा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. https://www.jlpt.jp/e/application/overseas_list.html, या लिंकवर जपान बाहेरील देशातील शहरात होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक मिळू शकते

कोठे घेतली जाते परीक्षा? 
जपानमधील सर्व महत्त्वाच्या शहरांत ही परीक्षा घेतली जाते. जपान बाहेरील शहरांमध्ये आपण ही चाचणी देऊ इच्छित असल्यास खाली दिलेल्या लिंकवर योग्य माहिती मिळू शकते. पुणे आणि मुंबई या महाराष्ट्रातील दोन्ही ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते. 

JLPTच्या पाच लेव्हल्स आहेत. लेव्हल्स ५ बेसिक आहे, तर १ ही सगळ्यामध्ये वरची. जपानी भाषेचे व्याकरण मराठी किंवा भारतीय भाषांसारखे असल्यामुळे जपानी शिकणे थोडे सोपे जाते. जपानी लिपी अवघड दिसत असली तरी त्याचे लॉजिक समजून घेतल्यास खूप इंटरेस्टिंग आहे. 

  • साधारण ६ महिने रोज दीडतास अभ्यास केल्यास JLPT लेव्हल्स ५ची परीक्षा देता येते. 
  • ७ -८ महिन्यांमध्ये JLPT लेव्हल्स ४चा अभ्यासही होतो. 
  • लेव्हल्स ३ साठी थोडा जास्त म्हणजे साधारण १०-१२ महिने अभ्यास करावा लागतो. 
  • २ वर्ष सातत्याने अभ्यास केल्यास लेव्हल्स ३पर्यंत सहज सर्टिफिकेशन करता येते. 
  • लेव्हल्स १ आणि २ केल्यास जपानमधल्या कॉलेजमध्ये जाऊन पुढे शिकण्याची संधीही मिळू शकते. 

(उच्च शिक्षणाविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या लेखात पाहूया) 

जपानी कंपन्यांमध्ये संधीसाठी जपानी भाषा येणे खूप महत्त्वाचे आहे. जपान फाउंडेशनप्रमाणे NAT-TEST जपानी भाषेची परीक्षा आहे. ती वर्षातून ६ वेळा होते. त्याची माहिती या वेबसाइटवर मिळेल http://www.nat-test.com/en/about.html या परीक्षेतही JLPT प्रमाणे ५ लेव्हल्स आहेत.  
महत्त्वाचे म्हणजे, योग्य शिक्षकांकडून जपानी शिकणे खूप महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com