कृत्रिम बुद्धिमत्ता...

चॅटजिपीटी हे प्रॉडक्ट बनविलेल्या कंपनीचं नाव आहे ‘ओपन एआय.’ जे तंत्रज्ञान वापरून हे प्रॉडक्ट बनवलं आहे त्याच नाव आहे ‘जनरेटीव्ह एआय.
Artificial intelligence chat gpt open ai  tool technology education
Artificial intelligence chat gpt open ai tool technology educationsakal
Summary

चॅटजिपीटी हे प्रॉडक्ट बनविलेल्या कंपनीचं नाव आहे ‘ओपन एआय.’ जे तंत्रज्ञान वापरून हे प्रॉडक्ट बनवलं आहे त्याच नाव आहे ‘जनरेटीव्ह एआय.

- प्रशांत लिखिते

चॅटजिपीटी हे प्रॉडक्ट बनविलेल्या कंपनीचं नाव आहे ‘ओपन एआय.’ जे तंत्रज्ञान वापरून हे प्रॉडक्ट बनवलं आहे त्याच नाव आहे ‘जनरेटीव्ह एआय.’ ‘ओपन एआय’ ही कंपनी सॅम आल्टमान आणि इलॉन मस्क यांनी सुरू केली.

कालांतराने इलॉन मस्क यांनी त्यांच्या इतर कामांच्या ताणामुळे ‘ओपन एआय’मध्ये काम करणे कमी केले. परंतु त्यांनी ‘ओपन एआय’ला मार्गदर्शन करणे आणि आर्थिक मदत देणे सुरू ठेवले. चॅटजीपीटी ही ‘ओपन एआय’च्या प्रॉडक्टची तिसरी आवृत्ती आहे. चॅटजीपीटी जगाला वापरासाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिली आहे.

Artificial intelligence chat gpt open ai  tool technology education
Chat Gpt : एमबीए, मेडिकलच नाही.. ChatGPT या 8 परीक्षांमध्ये पास झालाय, गुगलला देखील बसला धक्का

अजून चॅटजीपीटी बाल्यावस्थेत आहे, तरीही त्याने धुमाकूळ घातला आहे. ‘जनरेटिव्ह एआय’ हे तंत्रज्ञान त्याच्या नावाप्रमाणेच नवे कन्टेन्ट निर्माण करते. सध्या चॅटजीपीटी हे फक्त टेक्स्ट म्हणजे मजकूर निर्माण करू शकते. म्हणजे थोडक्यात, चॅटजीपीटीकडून तुम्ही पाहिजे ते लिहून घेऊ शकता किंवा प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.

आता तुम्ही म्हणाल, प्रश्नांची उत्तरे तर गुगल सुद्धा देते. परंतु एक फरक आहे. गुगलमध्ये तुम्हाला प्रश्नांच्या उत्तराची लिंक मिळते, तर चॅटजीपीटीमध्ये तुम्ही प्रश्न विचारायचा आणि थेट एखाद्या माणसांनी दिल्याप्रमाणे त्याचे उत्तर दिले जाते. चॅटजीपीटीकडे अनेक डेटा सेट्स आहेत, त्यामधून प्रत्येक वेळेस तुमच्या प्रश्नानुरूप एक नवे उत्तर दिले जाते.

Artificial intelligence chat gpt open ai  tool technology education
Chat GPT: नोकरी, बाजारपेठ : चॅट जीपीटी

चॅटजीपीटी वापरून तुम्ही ब्लॉग लिहू शकता आपल्या वेबसाइटसाठी मजकूर लिहून घेऊ शकता. ई-मेल लिहून घेऊ शकता, आपला बायोडेटा बनवून घेऊ शकता, कुठल्याही प्रकारचे टेक्स्ट, मजकूर तुम्ही लिहून घेऊ शकता. एवढेच काय, कविता सुद्धा करून घेता येते. चॅटजीपीटी सॉफ्टवेअर कोड सुद्धा लिहून देऊ शकते.

चॅटजीपीटी वापरण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा. ‘ओपन एआय’च्या साईटची लिंक मिळेल. ती क्लिक केल्यावर चॅटजीपीटीचे पेज ओपन होईल. पहिल्यांदा तुमचे ई-मेल किंवा जी-मेल वापरून लॉग इन करावे लागेल आणि त्या नंतर Try ChatGPT च्या बटणावर क्लिक करून आलेला ओटीपी वापरून तुम्ही चॅटजीपीटीचा उपयोग करण्यास सुरवात करू शकता.

Artificial intelligence chat gpt open ai  tool technology education
AI Technology : लष्करी अधिकाऱ्याने विकसित केले AI आधारित सॉफ्टवेअर

चॅटजीपीटीला सुरुवातीला काही सोपे, नंतर काही कठीण प्रश्न विचारले. ज्या वेगाने अचूक उत्तरे आली ते पाहून थक्क झालो. महेंद्रसिंग धोनीच्या कुल कॅप्टन्सीवर लेख लिहून घेतला आणि मग कविताही करून घेतली.

अशी कविता माझ्या डोक्यातून आलेली कल्पना होती. जगातील डेटाबेसमध्ये अशी कविता उपलब्ध नाही. मात्र, चॅटजीपीटी कल्पनेतली कविता रचून वास्तवात आणली. यमक अनुप्रास आदी अलंकारांचे यथायोग्य भान ठेऊन कविता रचलेली होती.

Artificial intelligence chat gpt open ai  tool technology education
Chat GPT : सगळं जमलं, पण UPSC Pre पास होणं हे Chat GPT च्या तोंडचाही घास नाही!

सुरूवातीला हा खेळ, गंमत वाटली, परंतु लगेच लक्षात आले की हे प्रकरण गमतीजमतीचे नाही, त्यापेक्षा जास्त मोठे आणि कदाचित भयावहही होऊ शकते. अनेकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. सध्या ‘चॅटजीपीटी’ला केवळ २०२१पर्यंतचा डेटा दिला आहे. भविष्यात त्याला थेट गुगलसारख्या डेटाबेसला लाइव्ह जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘चॅटजीपीटी’ केवळ शब्द प्रोसेस करू शकते. भविष्यात चित्रे, ऑडिओ, व्हिडिओ आदी प्रकारची माहिती प्रोसेस करू लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com