मी, ‘ती’ आणि स्पर्धा परीक्षा

मित्रांनो, आज आपण- मी, ‘ती’ आणि स्पर्धा परीक्षेचे वास्तव यांवर चर्चा करणार आहोत. मी म्हणजेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक परीक्षार्थी होय.
Competitive Examination
Competitive Examinationsakal

- अविनाश शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट

मित्रांनो, आज आपण- मी, ‘ती’ आणि स्पर्धा परीक्षेचे वास्तव यांवर चर्चा करणार आहोत. मी म्हणजेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक परीक्षार्थी होय. ‘ती’ एक आई असू शकते, बहीण असू शकते, मैत्रीण किंवा आयुष्याची जोडीदारही असू शकते. यशाच्या या प्रवासात आपली आई, बहीण, मित्र/मैत्रीण वा पती/पत्नी यांची आपल्या अभ्यासातील सहाय्यकारी भूमिका महत्त्वाची ठरते.

बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू करण्याचा निर्णय हा त्यांच्या पालकांशी चर्चा करून घेतात. काही पालक (बहुधा मुलींचे) ती वयाच्या अमुक-अमुक वर्षापर्यंत तयारी करेल व त्यानंतर अन्य मार्ग निवडेल, असे आराखडे बांधतात. त्यामुळे शक्यतो, पालक या प्रवासात अडथळे कधीच बनत नाहीत. त्यांची भूमिका सदैव पाठिंब्याचीच असते.

या सर्वात भावनिक साथ देण्यास आई-वडिलांची नितांत गरज असते. पुण्यासारख्या किंवा इतर ठिकाणी बाहेरगावी राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना पालकांनी दिलेले आर्थिक पाठबळ ही त्यांची उद्याची गुंतवणूक असते.

रिलेशनशिपचे काय?

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहू शकता का? याचा विचार करा. तयारीच्या आधीच तुम्ही नात्यात आहात की, तयारी करत असताना तुम्हाला एकत्र राहायचे आहे, हेही बघायला हवे. तुम्ही सकारात्मक बाबींचा विचार केला, तर तुमचा जोडीदार तुमची ध्येये आणि आकांक्षा समजून घेईल आणि तुम्हाला साथ देईल.

जर तुमचा सर्व वेळ तयारीसाठी गेला, तर तुमच्या जोडीदारासाठी ते ठीक आहे आणि ते तणाव समजून घेऊ शकतात आणि या प्रवासाची असुरक्षितता लक्षात घेऊन ती तुमच्या चांगल्या आणि वाईट काळामध्ये तुमच्या सोबत उभे राहू शकतात.

आयएएस कनिष्क कटारिया यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना रिलेशनशिपमध्ये राहणे चांगले आहे का? हा प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर खूप सुंदर आहे. ते म्हणतात, ‘एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात, मग ती तुमची स्वप्नवत नोकरी असो, पदोन्नती असो किंवा तुम्हाला माउंट एव्हरेस्ट सर करायचा असला तरीही, प्रेम तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यापासून कधीही रोखणार नाही. एक व्यक्ती जी तुम्हाला हे सर्व साध्य करण्यापासून रोखू शकते ती म्हणजे तुम्ही स्वतः!’

एकांतवास

सध्याच्या युगात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संवाद साधणे सोपे होत आहे. विद्यार्थी, विशेषत: जे रिलेशनशिपमध्ये आहेत, ते रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर चॅट करतात, फोनवर तासन्‌ तास बोलतात, सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘लॉग ऑन’ राहतात. या गोष्टी खरं तर परीक्षेच्या काळात अभ्यासापासून लक्ष विचलित करतात. त्याचा परिणाम असा होतो की, अभ्यासासाठी वेळच उरत नाही. मग वरील सर्व बाबींमुळे दबाव निर्माण होऊन चिंता/नैराश्य येते आणि विद्यार्थी परीक्षेतून माघार घेतात.

काही बाबी लक्षात घेता नवीन नातेसंबंध जोडणे हे व्यसनासारखे आहे. अचानक तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट अचानक सुंदर आणि रोमँटिक बनते. मात्र, त्यामुळे अभ्यास करणे खूप कठीण होते. त्याचा एकाग्रतेवर परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला कळते की, हे तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट नाही, तो फक्त एक पूरक पैलू आहे, तेव्हा निराशा येते आणि अनावश्यक तणाव निर्माण होतो.

तुम्ही भावनिकदृष्ट्या असुरक्षित होता. हा एक संघर्ष आहे, हा मार्ग तुम्हाला स्वतःहून पूर्ण करावा लागेल. त्यासाठी एकटे राहणे ही एक चांगली स्थिती आहे. तुमच्या एकांतवासाचा आनंद घ्या, स्वतःला जाणून घ्या आणि कठोर परिश्रम करा.

‘ट्वेल्थ फेल’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्वेल्थ फेल’चा संदर्भ द्यायचा झाला, तर नवीन स्पर्धा परीक्षेत येऊ घातलेले परीक्षार्थी म्हणजेच मनोज हे श्रद्धाच्या शोधात असल्याचे दिसतात. ती प्रत्येकालाच मिळेल असं सांगता येत नाही. ज्यांच्या आयुष्यात असेल त्यांच्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य नक्कीच सुकर होईल.

ज्यावेळी आपण पूर्णतः आत्मविश्वास गमावलेला आहे याची जाणीव होते, त्यावेळी आपल्यासोबतची व्यक्ती श्रद्धासारखी असेल, तर आपण यश खेचून आणू शकतो हे पुढील संवादावरून कळते. ती म्हणते, ‘मनोज, तुम चाहे आयपीएस ऑफिसर बनो, या चक्की मे काम करो. मैं सारी जिंदगी तुम्हारे साथ बिताना चाहती हूं.’ तरुणांनी याचा विचार करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com