मूलभूत संकल्पना स्पष्ट करा!

कोणतीही गोष्ट शिकण्याचा माझा दृष्टिकोन बहुआयामी आहे. त्यामुळे केवळ एकाच पद्धतीने अभ्यास न करता त्रुटी दूर करत राहणे, सतत सुधारणा करणे आणि स्वतःमधील कुतूहल कायम ठेवणे यावर माझा विश्‍वास आहे.
basic concepts by Ayush Prasad IAS Jalgaon how to learn something
basic concepts by Ayush Prasad IAS Jalgaon how to learn somethingSakal

- आयुष प्रसाद, आयएएस जिल्हाधिकारी - जळगाव

कोणतीही गोष्ट शिकण्याचा माझा दृष्टिकोन बहुआयामी आहे. त्यामुळे केवळ एकाच पद्धतीने अभ्यास न करता त्रुटी दूर करत राहणे, सतत सुधारणा करणे आणि स्वतःमधील कुतूहल कायम ठेवणे यावर माझा विश्‍वास आहे. सर्वप्रथम मी कोणत्याही गोष्टीमागील मूलभूत संकल्पना समजून घेण्यास प्राधान्य देतो.

त्यामुळे इतर संदर्भ समजायला सोपे जातात आणि आवश्‍यक ती माहितीही मिळते. कोणतीही गोष्ट करून बघा आणि मग त्यातून समोर येणाऱ्या निरीक्षणातून शिका, असे माझे तत्त्व आहे आणि त्याचा उपयोग मला व्यवहारातही होतो आहे.

सरकारी अहवालांपासून ते वृत्तपत्रांतील लेखांपर्यंत आणि अभ्यासाच्या पुस्तकांपासून ते अवांतर वाचनापर्यंत काहीही माझ्यासमोर असलं, तरी मी त्यात रस घेतो. ते आवडीने वाचतो आणि स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

समवयस्क, मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधणे ही माझी आवडती गोष्ट आहे आणि त्यामुळेदेखील मी अधिकाधिक समृद्ध होत जातो. नवीन दृष्टिकोन मिळतो. एखाद्या समस्येवर उपाय सापडतो. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी मित्रांनाही मला हेच सांगायचे आहे की, तुम्ही अधिकाधिक सकारात्मक राहा.

आव्हानांकडे शिकण्याची संधी म्हणून पाहा. त्यांच्याकडे अडथळा म्हणून पाहू नका. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काही ‘फीडबॅक’ दिला, तर त्याचा खुल्या मनाने स्वीकार करा. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास तयार राहा. लक्षात ठेवा, आज तुमच्या शिक्षणाची व्याप्ती हीच तुमच्या उद्याच्या ज्ञानाची पातळी ठरवत असते.

आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय मी माझ्यासह इतरांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी घेतला. आपल्या समाजासमोरील आव्हानांचे आणि विशेषत: ग्रामीण भागातील आव्हानांचे मी बारकाईने निरीक्षण केले. त्यातूनच आयएएस अधिकारी होण्याची आकांक्षा निर्माण झाली. यामुळे देशाच्या प्रशासनात प्रभावी भूमिका बजावता येते हे लक्षात आल्याने मी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

सेवा, नेतृत्व आणि पद्धतशीर बदल घडवून आणण्याची संधी या अनोख्या संयोगाने मला ‘आयएएस’कडे आकर्षित केले. सेवेतील प्रत्येक दिवस शिकण्याची, वाढण्याची आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची संधी आहे, असा माझा विश्‍वास आहे. आयएएस होण्याचा प्रवास केवळ करिअरची निवड नाही, तर सार्वजनिक सेवेसाठी कटिबद्ध राहण्यास शिकवतो, हे नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com