उच्चारशास्त्र वाचन

इंग्रजीचं अस्खलित वाचन करता येणं, ती भाषा बोलता-लिहिता येणं हे आता जागतिक बाजारपेठेत नोकरी आणि यश मिळवण्यासाठी महत्त्वाचं कौशल्य मानलं जातं. त्यामुळे लहानपणापासून इंग्रजीचा पाया भक्कम करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यातच गेल्या दशकात उच्चारशास्त्राला (फोनिक्स) अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने शाळांकडूनही याबाबत प्रयत्न केले जात आहेत.
english
english sakal

ग्रोइंग माइंड्स

प्रांजल गुंदेशा संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

इंग्रजीचं अस्खलित वाचन करता येणं, ती भाषा बोलता-लिहिता येणं हे आता जागतिक बाजारपेठेत नोकरी आणि यश मिळवण्यासाठी महत्त्वाचं कौशल्य मानलं जातं. त्यामुळे लहानपणापासून इंग्रजीचा पाया भक्कम करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यातच गेल्या दशकात उच्चारशास्त्राला (फोनिक्स) अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने शाळांकडूनही याबाबत प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळांमध्ये विविध प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात, तर सोशल मीडियावर काही वेगळीच माहिती मिळते. पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसते. त्यामुळे आज आपण याबाबत माहिती घेऊया.

संपूर्ण शब्द पद्धत

आपण शाळेत असताना कसं वाचन करत होतो, ते आठवा. एक एक अक्षर जोडत मग संपूर्ण शब्द वाचायचा आणि वारंवार घोकत तो पाठ करायचा या पद्धतीने आपण शाळेत शिकलो. सी-ए-टी कॅट असे वाचन शाळेत शिकवले जाते. या पद्धतीला संपूर्ण शब्द पद्धत (होल वर्ड मेथड) असे म्हटले जाते. यामध्ये स्मरणशक्तीच्या जोरावर आपण पूर्वी पुन्हा पुन्हा वाचलेले शब्द अधिक आत्मविश्‍वासाने वाचू शकतो. मात्र, यामुळे नवीन शब्द अचूकपणे वाचला जाईलच याची खात्री देता येत नाही.

उच्चारशास्त्र

उच्चारशास्त्र ही वर्णमालेतील अक्षराला ध्वनीशी जोडण्याची आणि त्याद्वारे त्याचा उच्चार समजून घेऊन शिकण्याची एक विकसित प्रणाली आहे. उच्चारातून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळे मुलांना ती अक्षरे, शब्द लक्षात ठेवण्यास आणि ओळखण्यास मदत होते. मुलांच्या डोक्यात उच्चाराचे विविध नमुने तयार झाले की, ते एखादा नवा शब्दसुद्धा सहजगत्या ‘डीकोड’ करू शकतात. म्हणजेच त्याचा उच्चार करू शकतात. उच्चारशास्त्राप्रमाणे भाषा शिकणे, वाचन करणे हे अधिक प्रभावी मार्ग आहेत, असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे.

फसवे शब्द

असे म्हटले जाते की, इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत की, जे ध्वनीशास्त्र किंवा उच्चारशास्त्रानुसार चुकीचे आहेत. त्यांना फसवे किंवा अपवादात्मक शब्द असे म्हटले जाते. उदा - Sure, once, come. संशोधकांनी

असेही निरीक्षण केले

आहे की, सुमारे २०० शब्द असे आहेत की, ज्यांतून मुले जे साहित्य वाचतात त्यांपैकी ७५ टक्के साहित्य तयार होते. उदा - The, do, we, their इ. या शब्दांना ‘साइट वर्ड’ (दृश्‍य शब्द) असे म्हणतात. आपण वाचत असलेल्या सर्व प्रकारच्या मजकुरात ते वारंवार येतात

अशा प्रकारच्या शब्दांची यादी मुलांनी तयार केल्यास त्यांना अस्खलित वाचन करणे सोपे जाते आणि त्यांच्यात आत्मविश्‍वास येतो.

एकात्मिक पद्धत

उच्चारशास्त्राच्या नियमांचा वापर करून नवनवीन शब्दसमूह किंवा वाक्ये वाचण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी संपूर्ण शब्द पद्धतीचा वापर करून घेत ‘साइट वर्डस’ शिकणे या संपूर्ण प्रक्रियेला एकात्मिक पद्धत असे म्हणतात. तिचा वापर करणे हे खूप प्रभावी ठरते. उच्चारशास्त्राच्या मदतीने मुलांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवा. त्यामुळे त्यांना त्यातील संदर्भ लक्षात ठेवणे सोपे जाईल. त्यांचा शब्दसंग्रह वाढेल.

‘उच्चारशास्त्रानुसार अभ्यास केल्यास आमच्या मुलाचा गोंधळ वाढेल’, अशी भीती सामान्यतः पालकांकडून व्यक्त केली जाते. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की, मुले जेव्हा ध्वनीशास्त्राचे सर्व नियम नीट शिकतात, तेव्हा त्यांना त्याचा फायदाच होतो.

सात महत्त्वाच्या गोष्टी

  • शिकणे : अक्षरे आणि त्यांचा उच्चार/ध्वनी समजून घेणे.

  • ओळखणे : हॅट, पिग यांसारख्या सोप्या शब्दांच्या उच्चारातील सुरुवात, मध्य आणि शेवटचा आवाज ओळखणे.

  • यमक : यमक जोडणारे शब्द शोधणे, शिकणे. उदा. मॅन, पॅन, कॅन, इ.

  • मिश्रण : शब्द वाचण्यासाठी वैयक्तिक आवाजांचे मिश्रण करायला शिकणे.

  • विभाजन : स्पेलिंग लिहिण्यासाठी शब्दांना तोडणे. ध्वनीनुसार त्यांचे विभाजन करून मग एकत्रित उच्चार करायला शिकणे.

  • दृश्य शब्द : खेळ आणि पुनरावृत्तीद्वारे अवघड वाटणारे किंवा सतत वापरले जाणारे शब्द शिकणे.

  • संधी : शब्दांचा अर्थ आणि त्यांचा वापर समजून घेण्यासाठी पुस्तक ऐकण्याच्या, वाचण्याच्या संधी निर्माण करणे.

  • मुले तीन वर्षांच्या वयापासून उच्चारशास्त्रावर आधारित शिक्षण घेऊ शकतात आणि त्याचा आनंदही लुटू शकतात. Intelligence Plus च्या यूट्यूब चॅनेलवर सर्व अक्षरांचे उच्चार करून दाखवणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com