Jobs
Jobsesakal

ट्रेनी- प्रोजेक्ट इंजिनिअर्ससाठी बंपर भरती! बी टेक झालेल्यांनी करा अर्ज

उमेदवारांनी 6 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे
Published on

BEL Recruitment 2022 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गाझियाबाद युनिट भारत एंटरप्राइझसाठी प्रशिक्षणार्थी अभियंता-I आणि प्रकल्प अभियंता-I च्या एकूण 63 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 6 एप्रिल 2022 पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Jobs
मुलासाठी वडिलांनी बनवला चक्क रणगाडा; खर्च केलं एवढे पैसे

BEL ने या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. उमेदवराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून B.E/B.Tech/B.sc (4 वर्षांचा अभ्यासक्रम) अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली असावी. असेच उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना bel-india.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे

Jobs
उंची वाढवायचीय? सकाळी 'ही' पाच आसने करा

शैक्षणिक योग्यता

ट्रेनी इंजिनिअर- प्रोजेक्ट इंजिनिअर- ४ वर्षाचा B.E/B.Tech/B.SC हा अभ्यासक्रम मान्यताप्रात्त विद्यापिठातून अभियांत्रिकी पदवी घेतलेली असावी. सामान्य / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांकडे 55% किंवा अधिक गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. SC / ST / PwBD उमेदवारांकडे 55% पेक्षा कमी गुणांसह अभियांत्रिकी पदवी असावी.

अर्ज फी - ट्रेनी इंजिनिअर- जनरल / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 200 रूपये भरावे लागतील. तर SC/ST उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली आहे.

प्रोजेक्ट इंजीनिअर- जनरल / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रूपये भरावे लागतील. तर तर SC/ST उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली आहे.

Jobs
महिनाभर ब्रश न केल्यास काय होईल?

उमेदवाराचे वय- ट्रेनी इंजिनअर- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 32 वर्षे आहे. तर, SC/ST श्रेणीतील उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट दिली आहे.

प्रोजेक्ट इंजिनिअर- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २८ वर्षे आहे. तर SC/ST श्रेणीतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com